esakal | Nobel Prize 2021 : मनाबे, हेझलमन, परिसी यांना फिजिक्सचं नोबेल जाहीर; जाणून घ्या योगदान
sakal

बोलून बातमी शोधा

The Nobel Prize in Physics 2021

Nobel Prize : मनाबे, हेझलमन, परिसी यांना फिजिक्सचं नोबेल जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

स्वीडन : फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार सुकुरो मनाबे, क्लॉस हेझलमन आणि जॉर्जिया परिसी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जटिल भौतिक प्रणाली समजण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसनं घेतला.

या पुरस्काराची घोषणा करताना ज्युरींनी सांगितलं की, सुकुरो मनाबे यांनी हे सिद्ध करुन दाखवलं की, वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळं कशाप्रकारे पृथ्वीवर तापमानवाढ होते. त्यांच्या या कमामुळं सध्याच्या जलवायू मॉडेलच्या विकासाचा पाया रचला.

गेल्या वर्षी यांना मिळाला होता पुरस्कार

गेल्या वर्षी फिजिक्सच्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार अमेरिकनं वैज्ञानिक आंड्रेया घेज, ब्रिटनचे रॉजर पेनरोज आणि जर्मनीचे संशोधक रिनार्ड गेनजेल यांना मिळाला होता. या तिघांना ब्लॅक होल्सवर संशोधनासाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्यांना एका सुवर्ण पदकासह १.१४ मिलियन डॉलर रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

हेही वाचा: कोव्हॅक्सिनला WHOची मान्यता मिळणार? आजच निर्णयाची शक्यता

दरम्यान, कालच यंदाचा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार अमेरिकेतील डेव्हिड ज्युलियस आणि अर्डम पॅटापुटियन या वैज्ञानिकांना जाहीर झाला. मानवी शरीरात तापमान आणि स्पर्श यांची संवेदना ओळखणाऱ्या संवाहकाचा शोध लावल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

loading image
go to top