शेती उत्पादन वाढविण्यासाठी अणु तंत्रज्ञान उपयुक्त ; राष्ट्र संघाच्या अणू ऊर्जा विभागाचा अहवाल

यूएनआय
शनिवार, 30 डिसेंबर 2017

शेतकऱ्यांनी अणू तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीमध्ये सुधारणा होण्याबरोबरच अन्नसुरक्षा आणि पाळीवर प्राण्यांचे आरोग्य सुधारणे असे अतिरिक्त फायदेही मिळू शकतील, अणुऊर्जा विभागाने (आयएईए) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विकासाच्या उद्देशाने "ओपेक' देशांनी दिलेल्या सहा लाख डॉलर निधीच्या जोरावर "आयएईए'ने जागतिक स्तरावर काही उद्दिष्ट्ये निश्‍चित केली आहेत.

न्यूयॉर्क : जगाच्या पाठिवरील अनेक लोकांना, विशेषत: आशियातील विकसनशील देशांमधील गरीब शेतकऱ्यांना पीकरोगांपासून बचाव करण्यासाठी अणू तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या अणुऊर्जा विभागाने म्हटले आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणीव्यवस्थापनातही प्रगती होऊ शकते, असा दावाही या वेळी करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांनी अणू तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीमध्ये सुधारणा होण्याबरोबरच अन्नसुरक्षा आणि पाळीवर प्राण्यांचे आरोग्य सुधारणे असे अतिरिक्त फायदेही मिळू शकतील, अणुऊर्जा विभागाने (आयएईए) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विकासाच्या उद्देशाने "ओपेक' देशांनी दिलेल्या सहा लाख डॉलर निधीच्या जोरावर "आयएईए'ने जागतिक स्तरावर काही उद्दिष्ट्ये निश्‍चित केली आहेत. या शाश्‍वत विकास कार्यक्रमामध्ये भूकबळींची संख्या कमी करणे, अन्नसुरक्षा, पोषणमूल्य असलेल्या अन्नधान्यात वाढ आणि शाश्‍वत शेती अशा काही उद्दिष्टांचा समावेश आहे. 

एकूण निधीपैकी दोन तृतियांश रक्कम ही बदलत्या वातावरणाचा सामना करणाऱ्या बांगलादेश, कंबोडिया आणि नेपाळ या देशांमधील भात उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दिली जाणार आहे. जगातील 90 टक्के तांदूळ आशियामध्ये उत्पादित होतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये तापमानवाढीमुळे अणि पावसाच्या अनियमितपणामुळे पिकांवर नवीन रोग आणि कीड निर्माण होऊ लागले आहेत. शिवाय, वातावरण बदलामुळे प्रचंड पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, सागर पातळीत वाढ असे प्रकारही घडत आहेत. या सर्वांचा परिणाम उत्पादनावर होत आहे.

किनारी प्रदेशांतही जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याने जमिनीची उत्पादकताही कमी झाली आहे. त्यामुळे अणू तंत्रज्ञान वापरून शास्त्रज्ञ पाणीव्यवस्थापन तंत्र सुधारू शकतात आणि रोग नष्ट करणाऱ्या खतांची निर्मिती करू शकतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे. यामुळे कमी खर्चात उत्पादकता वाढू शकते. सुधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढल्याने आपोआपच अन्नसुरक्षा वाढून भूकबळींची संख्या कमी करता येईल, असेही अहवालात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international agriculture production improve needs technology