दहशतवादी हाफिज सईद लढवणार निवडणूक

hafeez
hafeez

लाहोर : कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाने हाफिज सईदची नजरकैदेतून काही दिवसांपूर्वी सुटका केली होती. त्यानंतर आता तो निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. मात्र, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतची कोणतीही माहिती हाफिजकडून देण्यात आलेली नाही.  

दरम्यान, जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेकडून सार्वत्रिक निवडणुका लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर 'मिली मुस्लिम लिग' या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com