भारतीय सीमारेषेवर चीनी सैन्याची आक्रमक हालचाल

वृत्तसंस्था
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

'स्काय वुल्फ कमांडो' ही तुकडी या प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक युद्धासाठी तयार करण्यात आली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलाम प्रश्नावरून निर्माण झालेला तणावाच्या पार्श्वभूमीवर ही तुकडी येथे तैनात करण्याचा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. 

बीजिंग : चिनी सैन्य दलाच्या पश्चिम मुख्यालयाने 'स्काय वुल्फ कमांडो' ही सैन्य दलातील विशेष तुकडी चीन-भारत सीमारेषेवर तैनात केली आहे. चीन व भारतामधील सुमारे साडेतीन हजार लांबीच्या सीमारेषेच्या सुरक्षेची जबाबदारी पश्चिम मुख्यालयाकडे आहे. 'इन्फॉर्मेटाइज्ड वॉरफेअर' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन संपूर्ण चीनी सैन्य दलाच्या आधुनिकीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प येथील सरकारने हाती घेतला आहे. 

'स्काय वुल्फ कमांडो' ही तुकडी या प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक युद्धासाठी तयार करण्यात आली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलाम प्रश्नावरून निर्माण झालेला तणावाच्या पार्श्वभूमीवर ही तुकडी येथे तैनात करण्याचा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. 
 
भारतीय सीमारेषेवर क्यूटीएस-11 ही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली तैनात करण्यात आली आहे. क्यूटीएस-11 ही यंत्रणा अमेरिकेच्या सैन्याकडून वापरली जाते अशाच प्रकारची ती यंत्रणा असल्याचे चीन सैन्य तज्ज्ञांनी सांगितले. व्हॉल्फ कमांडो' ही चीनी सैन्याचा एक भाग असून, जेव्हा कोणतीही आपातकालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा या यंत्रणेला पाचारण केले जाते. यातील सैन्याला युद्धजन्य परिस्थितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News China Troops Indian Border