आई-वडिलांना गमावल्यानंतर नऊ वर्षांनी 'तो' आला भारतात

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

इस्त्रायल दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मोशेशी भेट घेतली होती. मोशेने पुन्हा एकदा नरिमन पॉइंट येथे येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेवरून मोदींनी त्याला नेत्यानाहू यांच्यासोबत भारत दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले होते.   

नवी दिल्ली : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांना गमावलेला मोशे होल्त्जबर्गभीही भारतात आला आहे.

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात दहशत पसरली होती. दहशतवादी अजमल कसाबने जेव्हा हा हल्ला केला तेव्हा मोशेचे माता-पिता रब्बी गवेरिअल आणि रिवाका होल्त्जबर्गसह नरीमन पॉइंटच्या यहूदी सेंटरमध्ये होते. त्यादरम्यान मोशेच्या डोळ्यांदेखत त्याच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली होती. इस्त्रायल दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मोशेशी भेट घेतली होती. मोशेने पुन्हा एकदा नरिमन पॉइंट येथे येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेवरून मोदींनी त्याला नेत्यानाहू यांच्यासोबत भारत दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले होते.   

दरम्यान, मोदींनी जुलै 2017 रोजी इस्त्रायल दौऱ्यावर असताना 5 जुलैला मोशेला भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्या आमंत्रणावरून त्याने भारत भेटीवर येण्याचे सांगितले. 

Web Title: marathi news international news moshe holtzberg to visit nariman house 9 years after 26 11 attacks