स्टीव्ह जॉब्स यांचा नोकरी अर्ज लिलावात ; 32 लाख अंदाजित रक्कम

वृत्तसंस्था
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

या लिलावासाठी 50 हजार डॉलर एवढी अंदाजित रक्कम निर्धारित करण्यात आली असून, हा एक पानी अर्ज जॉब्स यांनी 1973 मध्ये लिहिला होता. या अर्जामध्ये स्पेलिंग आणि विरामचिन्हांच्या अनेक चुका दिसून येतात, एवढेच काय पण त्यांनी स्वत:चे नावदेखील "स्टीव्हन जॉब्स' असे चुकीच्या पद्धतीने लिहिले असून, पत्ता म्हणून "रिड कॉलेज'चा उल्लेख केला आहे. काही काळ त्यांनी ओरेगॉन महाविद्यालयामध्येही धडे गिरवले होते, असे बोस्टनमधील लिलाव करणाऱ्या आर. आर. ऑक्‍शन या संस्थेने निवेदनामध्ये म्हटले आहे.

लॉस एंजेलिस : "ऍपल'चे सहसंस्थापक आणि आघाडीचे टेक्‍नोक्रॅट दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये नोकरीसाठी केलेल्या अर्जाचा पुढील महिन्यामध्ये लिलाव होणार आहे. तब्बल चार दशकांपूर्वीच्या या अर्जातून ऍपल संस्थापकांची तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करण्याची जिद्द दिसून येते. 

या लिलावासाठी 50 हजार डॉलर एवढी अंदाजित रक्कम निर्धारित करण्यात आली असून, हा एक पानी अर्ज जॉब्स यांनी 1973 मध्ये लिहिला होता. या अर्जामध्ये स्पेलिंग आणि विरामचिन्हांच्या अनेक चुका दिसून येतात, एवढेच काय पण त्यांनी स्वत:चे नावदेखील "स्टीव्हन जॉब्स' असे चुकीच्या पद्धतीने लिहिले असून, पत्ता म्हणून "रिड कॉलेज'चा उल्लेख केला आहे. काही काळ त्यांनी ओरेगॉन महाविद्यालयामध्येही धडे गिरवले होते, असे बोस्टनमधील लिलाव करणाऱ्या आर. आर. ऑक्‍शन या संस्थेने निवेदनामध्ये म्हटले आहे. विशेष क्षमता म्हणून त्यांनी आपण टेक किंवा डिझाईन इंजिनिअर आहोत, असे म्हटले आहे. येथे त्यांनी हेवीट्ट पॅक्कर्ड या कंपनीच्या नावाचाही उल्लेख केला आहे. ही कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. 

या अर्जामध्ये जॉब्स यांनी आपण नेमक्‍या कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत, याचा मात्र उल्लेख केलेला नाही. जॉब्स यांनी या अर्जामध्ये आपल्याकडे वाहनाचा परवाना असल्याचे सांगत वाहन चालविण्यास मिळण्याबाबत आपण साशंक आहोत, असे म्हटले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे जॉब्स यांनी तेव्हा आपल्याकडे फोन नसल्याचे म्हटले आहे. आठ ते पंधरा मार्चदरम्यान या अर्जाचा लिलाव होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News International News Steve Jobs Job Application