चीनकडून डोकलाममध्ये पुन्हा रस्तेबांधणी

वृत्तसंस्था
बुधवार, 13 डिसेंबर 2017

गेल्या दोन महिन्यांत चीनकडून डोकलाममध्ये नवे रस्ते बनवण्यात आल्याचे सॅटेलाईटच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या छायाचित्रांमधून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 'चीनी रोड वर्कर्स' या वादग्रस्त भागात सध्याच्या रस्त्यांचा विस्तार केला जात आहे. भारत आणि चीनचे सैन्य ज्या ठिकाणी उभे होते. येथे जवळच हा रस्त्याचा भाग आहे.  

नवी दिल्ली : डोकलामवादानंतर चीनने आता पुन्हा एकदा कुरापती सुरु केल्या आहेत. चीनकडून या भागात रस्तेबांधणी करण्यात आल्याची माहिती सीमेपासून जवळ असलेल्या भागातील सॅटेलाईट छायाचित्राच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. त्यामुळे भारत-चीनदरम्यान आता पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 

काही महिन्यांपूर्वी चीनने भूतानचा भाग असलेल्या डोकलाम परिसरात रस्तेबांधणी सुरु केली होती. त्यानंतर भूतानने भारताकडे मदतीसाठी आवाहन केले होते. भूतानच्या या आवाहनानंतर भारतीय लष्कर भूतानच्या रक्षणासाठी पुढे आले होते. भारतीय लष्कराने चीनला सैन्य मागे घेण्यास वारंवार इशारा दिला होता. मात्र, चीनच्या कुरापती सुरुच होत्या. त्यानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैन्य तब्बल 70 दिवस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर चीनकडून ही कारवाई मागे घेण्यात आली होती.

मात्र, आता गेल्या दोन महिन्यांत चीनकडून डोकलाममध्ये नवे रस्ते बनवण्यात आल्याचे सॅटेलाईटच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या छायाचित्रांमधून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 'चीनी रोड वर्कर्स' या वादग्रस्त भागात सध्याच्या रस्त्यांचा विस्तार केला जात आहे. भारत आणि चीनचे सैन्य ज्या ठिकाणी उभे होते. येथे जवळच हा रस्त्याचा भाग आहे.  

दरम्यान, या मार्गावरील अलीकडचा रस्ता एक किमीपर्यंत तयार करण्यात आला असून, एका सॅटेलाईटच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या छायाचित्रातून ही बाब उघडकीस आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international Satellite Pictures Shows China Built New Roads In Last 2 Months In Doklam