कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीत 31 जणांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

सोनोमा (कॅलिफोर्निया) : कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात जंगलाला लागलेल्या आगीत आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे सुरक्षित स्थळी जाण्याच्या धावपळीत शेकडो नागरिक बेपत्ता झाले आहेत. यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढू शकते. 

आगीचे केंद्रस्थान असलेल्या भागामध्ये अंदाजे 3500 कुटुंबे राहतात. ही आग एकूण 77 हजार हेक्‍टर परिसरात पसरली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरीही जोरदार वारे वाहत असल्याने या भागातील वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

स्थानिक प्रमाणवेळेनुसार, शुक्रवारी पहाटे या भागात पुन्हा जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे त्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जवळपास आठ हजार कर्मचारी झटत आहेत. 

या भागातील 900 हून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद सुरवातीला करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी 437 जण सुरक्षित असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला मिळाली आहे. उर्वरित नागरिकांपैकी किती जण मृत्युमुखी पडले आहेत आणि किती जण सुखरूप असूनही प्रशासनाशी संपर्क साधू शकलेले नाहीत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

Web Title: marathi news marathi websites California Fire