लंडनमध्ये मेट्रोत स्फोट; दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

लंडन : लंडनमधील मेट्रोमध्ये आज (शुक्रवार) झालेल्या स्फोटात काही प्रवासी जखमी झाले असून प्रशासनाने दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता गृहीत धरून तपास सुरू केला आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा स्फोट झाल्याने 2005 च्या जुलैमध्ये लंडनमध्येच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या झाल्या. 

लंडनच्या पश्‍चिम भागातील पार्सन्स ग्रीन स्टेशनवर स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 8.20 वाजता हा स्फोट झाला. यामुळे लंडनमधील काही भागातील मेट्रो वाहतूक बंद करण्यात आली. धावत्या मेट्रोमध्ये एका डब्यात हा स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागली. या स्फोटामुळे जवळ असलेले काही प्रवासी भाजले गेले; तर या घटनेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. 

या घटनेसंदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना प्रत्येक घडामोडीची माहिती दिली जात आहे. 'सध्या यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणताही अंदाज वर्तविणे योग्य ठरणार नाही', अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केली. 

असे असले, तरीही दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता गृहीत धरूनच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

ब्रिटनमध्ये यंदा आतापर्यंत चार दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये एकूण 36 जणांना जीव गमवावा लागला आहे. 

Web Title: marathi news marathi websites London News London Terror attack