ट्रम्प यांचा उमेदवार चितपट; अलाबामात रिपब्लिकन पक्षावर पराभवाची नामुष्की 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 डिसेंबर 2017

वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील अलाबामा राज्यातील सिनेटची जागा हिसकावून घेण्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला यश मिळाले आहे. 25 वर्षांत पहिल्यांदाच अलाबामातील सिनेटच्या जागेवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराने विजय संपादन केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा धक्का मानला जातो. 

ट्रम्प यांचे समर्थन लाभलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉय मूरे यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या डग जोन्स यांनी या निवडणुकीत धूळ चारली. दोघांना मिळालेल्या मतांमध्ये अवघ्या अर्धा टक्का मताचा फरक आहे. 

अलाबामा हे राज्य रिपब्लिकन पक्षाचा गड मानला जातो. त्यामुळे जोन्स यांचा विजय डेमोक्रॅटिक पक्षासाठी महत्त्वाचा ठरला आहे. मूरे यांचे ट्रम्प यांनी जोरदार समर्थन केले होते. त्यांच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी अनेक ट्विट आणि वक्तव्य केली होती; मात्र त्यानंतरही जोन्स यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा ट्रम्प यांचा मोठा राजकीय पराभव मानला जात आहे. 

बाललैंगिक शोषणाचे आरोप भोवले 
रिपब्लिक पक्षाचे उमेदवार असलेल्या मूरे यांच्यावर बाललैंगिक शोषणाचे आरोप झाले. त्यामुळे मूरे यांची प्रचार मोहीम अडचणीत आली होती. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतरही ट्रम्प यांनी मूरे यांची जोरदार पाठराखण केली होती, तर इतर रिपब्लिकन नेत्यांनी मात्र मूरे यांच्या प्रचार मोहिमेपासून दूर राहणेच पसंत केले होते. नैतिक मूल्य न पाळणाऱ्यांना मतदारांनी दिलेली ही चपराक आहे, असे मत अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites US Donald Trump Republican Party