ऑस्कर पुरस्कार 2018 : सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

लॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला, अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले.

यंदा गईलर्मो डेल टोरोचा 'द शेप ऑफ वॉटर' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले. डार्केस्ट अवर चित्रपटासाठी गॅरी ओल्डमॅन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी चित्रपटातील अभनयासाठी फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय प्रेक्षकांचे लक्ष प्रियांका चोप्राकडे लागले होते. परंतु, आजारी असल्याने आपण यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर राहू शकले नसल्याचे तीने इन्टाग्रामवर पोस्ट केले आहे. 

आतापर्यंत जाहीर झालेले पुरस्कार

 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जॉने (आय, टॉन्या)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
 • सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) - द सायलेंट चाईल्ड
 • सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट - हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405
 • सर्वोत्कृष्ट संकलन - डंकर्क
 • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर 2049
 • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर - कोको
 • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - डिअर बास्केटबॉल
 • सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट - अ फँटॅस्टिक वुमन (चिली)
 • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन - द शेप ऑफ वॉटर
 • सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण - डंकर्क
 • सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन - डंकर्क
 • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर - इकरस
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टम थ्रेड
 • सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा - डार्केस्ट अवर
 • सर्वोत्कृष्ट दिगिदर्शन - गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news oscar awards academy awards oscar nominations