मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र

टायटॅनिक अपघातग्रस्त होऊन बुडालं हे खरं. पण, बुडाले म्हणजे नेमकं किती खोल पाण्यात गेलं.
मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र

सांगली : १५ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक जहाज अटलांटिक समुद्रात (titanic ship drawn in atlantic sea) कसे आणि का बुडाले हे आता जहाजावरील हॉलिवूड चित्रपटामुळे (hollywood) अख्ख्या जगाला कळाले आहे. (world ocean day) त्यावेळी प्रवासी वाहतूक लोक पाण्यात बुडून मरण्यापेक्षा जास्ती लोक हायपोथर्मियांने म्हणजेच पाण्याच्या अतिथंडपणामुळे गारठून मरण पावले. (world ocean day 2021) हे बऱ्याचजणांना आजही माहीत नसावे. (world ocean day 2021 theme) हायपोथॅर्मियांवर पुन्हा कधीतरी. टायटॅनिक अपघातग्रस्त होऊन बुडालं हे खरं. पण, बुडाले म्हणजे नेमकं किती खोल पाण्यात गेलं. समुद्र पातळीपासून समुद्रतळ किती खोल होता/आहे? (mariana trench deep sea in the world)

टायटॅनिक जवळपास तीन तास तिरके होऊन तरंगत होते. (ocean day 2021) त्यानंतर पोहायला गेल्यावर पाण्यात जशी सुळकी मारतो, पाणी कापत पाण्यात खोलवर जातो अगदी तसेच शेवटच्या कांही सेकंदात ते जहाज पाण्यात शिरले. (world ocean day quotes) जणू त्या जहाजाने सुळकीच मारली. खाली खाली जात शेवटी १२ हजार फूट खाली गेले. मग समुद्र तळ गाठला. १२ हजार फूट म्हणजेच ३ किलोमीटर आणि ८०० मीटर इतकी भयानक खोली होती. (world oceans day) इतकं अंतर रस्त्याने चालत जायचं म्हटलं तर किमान ४५ ते ५० मिनिटे चालावं लागेल. विचार करा हेच अंतर समुद्र तळ गाठायला लागतं म्हणजे किती खोली असावी. ही जवळपास ४ किलोमीटर खोली जर अटलांटिक समुद्राची असेल तर मग नेमका समुद्र असतो तरी किती खोल?

मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र
शाब्बास करवीरकन्या! एव्हरेस्टला गवसणी घालणारी कस्तुरी पहिली रणरागिणी

जगन्मान्य अशी समुद्राची जागतिक सरासरी खोली ही ३८०० ते ४००० मीटर अशी मानली जाते. सन १८७५ म्हणजे आजपासून दीडशे वर्षांपूर्वी म्हणजेच टायटॅनिक बुडायच्या आधी ३७ वर्षे. HMS_चॅलेंजर जहाज पॅसिफिक समुद्रातून जात होते. तंत्रज्ञान नक्कीच अगदी बाल्यावस्थेत होते. जहाजाला लागणारी माहिती वगैरे यांची देवाणघेवाण शक्यच नव्हती. जहाजाने कापलेले अंतर, वेग, समुद्राची खोली मोजणे म्हणजे अवघड काम. चॅलेंजर जहाज कामानिमित्त पॅसिफिक समुद्रात एकेठिकाणी थांबले. नेहमीप्रमाणे नांगर टाकून थांबायचा विचार केला. तो नांगर भुर्रकन दोरखंडासहित समुद्रात गेला. झाली का पंचायत. आता काय करायचं?? नांगर तर लागणारच, मग त्यांनी नांगर शोधण्यासाठी दुसऱ्या दोरखंडाला एक जड असा हुक बांधून समुद्र तळाला सोडला. जेणेकरून त्या हूकमध्ये नांगर अडकेल, मग वर खेचता येईल. ते नाविक दोरखंड सोडू लागले पण तळ काही लागेना.

त्यांनी दोरखंडाला अजून दोरखंड जोडले. परत ते पाण्यात सोडू लागले. आता मात्र जाड दोरखंड संपले. तळ काही लागल्याचे स्पष्ट होत नव्हते. त्यांनी इतकं खोलपर्यंत कधीच कांही सोडले नव्हते की ऐकलेही होते. कंटाळून त्यांनी दोरखंड वर ओढायला सुरवात केली. वर खेचता खेचता त्यांनी दोरखंड मापायला सुरुवात केली. त्याची लांबी ८ किलोमीटर १८४ मीटर इतकी भरली. विशेष म्हणजे इतक्या अंतरानंतर ही तळ लागला नव्हताच. याची रेकॉर्डवर नोंद केली आणि पुढील प्रवासास निघाले.

मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र
'करिअर उद्ध्वस्त करुन त्याला मी रस्त्यावर आणेन'; केआरकेची सलमानला धमकी

पुढील २ वर्षांनी म्हणजे सन १८७७ मध्ये अटलांटिक व पॅसिफिक समुद्राचे नकाशे प्रकाशित केले गेले (असे नकाशे आजही वेळोवेळी प्रकाशित केले जातात. नवनवीन मिळालेल्या माहिती वाढवून जुने नकाशे रद्द केले जातात) सन १८७७ च्या नवीन नकाशात मात्र चॅलेंजरने शोधलेल्या जागेचा उल्लेख करत त्या जागेला जहाजाच्या या कामाच्या गौरवार्थ चॅलेंजर डीप असे नाव देण्यात आले. त्याची ज्ञात खोली म्हणून ८१८४ मीटर इतकी नमूद केली. बघा विचार करून पाण्याच्या पृष्ठभागावरून खाली सव्वा आठ किलोमीटर गेल्यावरही तळ लागत नाही. सन १९५१. चॅलेंजर २ ने हे नेमकं चॅलेंजर डीप आहे तर किती खोल हे बघायचं ठरवलं.

हे मरियाना ट्रेंच म्हणजे पॅसिफिक महासमुद्राच्या पश्चिमी भागात मरियाना बेटांपासून २०० किलोमीटर पूर्वेकडे असणारी समुद्रातळाशी असलेलया पर्वतरांगांतील एक अतिविशाल, अतिखोल व अतिलांबट अशी चंद्रकोर आकाराची अतिभव्य दरी आहे. याच दरीतील खोल जागा म्हणजे चॅलेंजर डीप.bयोगायोगाने दुसरे जहाजही चॅलेंजर २ नावाचेच होते. त्यांनीच जागेची नेमकी खोली त्याकाळी उपलब्ध इको साउंडर तत्रज्ञाना वापर करून मोजली.

आजही तीच खोली मानवाला माहीत असलेली समुद्राची शेवटची खोली ग्राह्य मानली जाते. असाच अजून एक धाडसी प्रयत्न हॉलिवूड दिग्दर्शक म्हणजे जेम्स कमेरून. हो तोच ज्याने टायटॅनिक चित्रपट बनवून आपल्यासमोर तो भयानक इतिहास हुबेहूब सुंदररित्या सादर केला आहे. बहुदा याच चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान त्याला समुद्राच्या खोलीविषयी कुतूहल निर्माण झाले असावे. जिज्ञासू जेम्स यानेही चॅलेंजर डीपला चॅलेंज द्यायचे ठरवले. २६ मार्च २०२१ रोजी त्याने प्रेशर वेसलमधून हा प्रवास केला. पूर्ण प्रवासाची ३D डॉक्युमेंटरी नेटवर पहायला मिळते.

हिमालयतील एव्हरेस्ट किती उंचीवर आहे? ८८५० मीटर म्हणजे समुद्र सपाटीपासून एवरेस्ट ८ किलोमीटर ८५० मीटर उंचीवर आहे. मरियाना ट्रेंचमधील सर्वात खोल पॉइंटवर पाण्याचे तापमान १ ते ४ डिग्री सेल्सियस असते. प्रेशर इतकं प्रचंड आहे, की तिथं पर्यंत माणूस जिवंत पोचणे अशक्य. त्या दाबाखाली कोणताही मानव आला तर प्रत्येक बाजूने शंभर हत्तीचे वजन अंगावर दाबल्यासारखे होईल. (प्रेशर असते १०८६ बार) एक बार प्रेशर म्हणजे एक वर्ग सेंटिमीटरवर एक किलो वजन देणे. असे एका सेंटिमीटर भागावर १०८६ किलो वजन पडले तर कसे होईल? शरीराचा भुगा होऊन जाईल. तिथं विना प्रेशर वेसल पाण्यातील यान घेऊन गेल्याशिवाय जाणे अशक्य. दाबामुळे पाण्याची घनताही जवळपास ५ टक्क्यांनी वाढलेली असते. एक लिटर पाणी जे एक किलो असतं ते इथं १ किलो आणि ५० ग्राम इतके भरणार.

मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र
"मोदींनी पेट्रोल डिझेलवरील अन्याय दूर केला"; काँग्रेसचा टोला

इथं सूर्य प्रकाश अजिबात पोचत नाही. सूर्यप्रकाश समुद्रात जास्तीत जास्त ३३०० फूट म्हणजेच १००० मीटरपर्यंतच पोचू शकतो तेही वातावरण साफ व भर दुपार असेल तरच. अशा अंधाऱ्या, प्रचंड पाण्याच्या दबावातही कांही समुद्री जीव घर बनवून आहेत, हीच निसर्गाची किमया. हिमालयातील एव्हरेस्ट ८ किलोमीटर ८५० मिटर याला जर समुद्र सपाटीच्या उंचीवरून तळाबरोबर कापला आणि त्याला जर या चॅलेंजर डीप मध्ये बसवला तरीही एवरेस्टच्या टोकावर किमान २५०० मीटर म्हणजेच अडीच किलोमीटर इतकं पाणी अजूनही वर राहीलय तेंव्हा कुठं समुद्राचा वरचा भाग येईल. नेमकी किती खोली कळली का? तो आकडा आहे १०९८४ मीटर. जवळपास ११ किलोमीटर. समुद्रपातळीपासून समुद्रतळ अकरा किलोमीटर खाली. मरियाना ट्रेंच वरून जाण्याचा मला योग दोन वेळा आला आहे. तसं वरून तरी वेगळं कांही जाणवत नाही. पण जहाजातील खोली दाखवणाऱ्या यंत्रावर मात्र ‘खोली अज्ञात’ म्हणजेच स्केलपुढील आकडा आहे इतकंच सांगते.

असे आहे मरियाना_ट्रेंच...

लोकेशन : पश्चिमी पॅसिफिक महासमुद्र, मारियाना बेटांपासून २०० किमी पूर्वेकडे.

मरियाना ट्रेंच लांबी : २५५० किलोमीटर. रुंदी : ६९ किलोमीटर.

पाण्याचे तापमान : १ ते ४ डिगरी सेल्सियस.

पाण्याचे प्रेशर : १०८६ बार (किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर) (समुद्र सपाटीवर हे प्रेशर फक्त १ बार असते)

चॅलेंजर डीरच्या खोलीचे बऱ्याच संशोधक, शास्त्रज्ञांना कुतूहल, जिज्ञासा राहिली आहे.

२३ जानेवारी १९६० रोजी डॉन मालश आणि जॅक स्पाकर ही पहिली मानव जोडी त्या खोलीपर्यंत जाऊन आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com