'करिअर उद्ध्वस्त करुन त्याला मी रस्त्यावर आणेन'; केआरकेची सलमानला धमकी

सलमान खानचं करिअर संपुष्टात आणण्याचा केआरकेचा निर्धार
salman khan and KRK
salman khan and KRK

स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमार आर खानने Kamaal R Khan अभिनेता सलमान खानचं Salman Khan करिअर संपुष्टात आणण्याचा निर्धारच केला आहे. सलमानने केआरकेला मानहानीची नोटीस पाठवली होती. 'मी केलेला राधे चित्रपटाचा रिव्ह्यू सलमानला आवडला नाही, म्हणून त्याने मानहानीचा दावा केला', असं केआरकेने सुरुवातीला म्हटलं होतं. मात्र 'बीईंग ह्युमन' संस्थेमार्फत सलमानने पैशांचा घोटाळा केल्याचा आरोपांमुळे हा दावा केल्याचं सलमानच्या वकिलांनी स्पष्ट केलं. या सर्व प्रकरणावर आता केआरकेने ट्विट करत राग व्यक्त केला आहे. (Kamaal R Khan being sued for defamation by Salman Khan vows i will bring him on the streets)

'याने अनेक लोकांचं करिअर संपवल्याचं मी ऐकलंय. जे कोणी त्याच्याविरोधात बोलतात, त्याचं करिअर त्याने उध्वस्त केलंय. पण मी शांत बसणार नाही. मी त्याचं करिअर संपवून त्याला रस्त्यावर आणेन', असं ट्विट केआरकेनं केलंय. याआधी केलेल्या एका ट्विटमध्ये काही बॉलिवूड कलाकारांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावाही केआरकेनं केला.

'वीसहून अधिक बॉलिवूडमधल्या लोकांनी मला कॉल केला आणि पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. मी जे करतोय ते त्यांना कधीच जमलं नाही, असं ते म्हणाले. त्याला शत्रू बनवण्याला ते घाबरत होते', असं त्याने लिहिलं. केआरकेने सलमान खानच्या 'बीईंग ह्युमन' या संस्थेविरोधात आरोप केले होते. 'राधे' चित्रपटाचा या मानहानीच्या दाव्याशी काहीच संबंध नसल्याचं सलमानच्या वकिलांनी स्पष्ट केलं.

salman khan and KRK
इमरान हाश्मी vs सलमान खान; 'टायगर ३'मध्ये लढणार भारत-पाकिस्तानचे टायगर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com