Mars Express : मंगळावरून प्रथमच झाले थेट प्रक्षेपण

युरोपच्या अवकाश संशोधन संस्थेच्या यानाची कामगिरी
Mars Express european space agencys first ever mars livestream
Mars Express european space agencys first ever mars livestreamsakal

पॅरिस : युरोपिय अवकाश संशोधन संस्थेने (युरोपीय स्पेस एजन्सी, ईएसए) पहिल्यांदाच मंगळावरून थेट प्रक्षेपण करण्यात यश मिळविले आहे. युरोपचे मार्स एक्स्प्रेस हे यान मंगळाच्या कक्षेत फिरत असून त्याने मंगळाचे चित्रण पृथ्वीकडे पाठविले.

हे चित्रण ३० कोटी किलोमीटर दूरवरील पृथ्वीवर केवळ १७ मिनिटांत पोहोचले. येथील उपकरणांद्वारे छायाचित्रण मिळण्यास आणखी एक मिनीट लागला. खोल अवकाशीय घटनांची नोंद घेण्यासाठी स्पेनमध्ये उभारलेल्या दुर्बिणीच्या माध्यमातून होणाऱ्या चित्रणाच्या प्रसारणात पावसामुळे काही काळ व्यत्यय आला होता. ‘मार्स एक्स्प्रेस’वर बसविलेल्या ‘व्हिज्युअल मॉनिटरिंग कॅमेऱ्या’ने (व्हीएमसी) मंगळाची छायाचित्र काढली आहेत. हा कॅमेरा ‘वेबकॅम’च्या रूपात कार्य करतो.

Mars Express european space agencys first ever mars livestream
Mumbai : पश्चिम उपनगराला पावसाळ्यात दिलासा नाही! ३१ ठिकाणची कामे पुढील वर्षी

कॅमेऱ्याने केलेल्या चित्रणात प्रथम मंगळाचा एक तृतीयांश भाग दिसतो. तो हळूहळू मोठा होत जातो आणि नंतर पुन्हा तो लहान होण्यापूर्वी अवकाश यानाने मंगळाची परिक्रमा केल्याचेही दिसते. काही छायाचित्रांमध्ये सफेद ढग स्पष्टपणे दिसतात.

‘मार्स एक्स्प्रेस’ हे यान मंगळाभोवती गेल्या २० वर्षांपासून फिरत आहे. आपल्या पृथ्वीशेजारील ग्रहाभोवती परिक्रमेला यंदा २० व्या वर्षे झाल्याचे स्मरण म्हणून थेट प्रक्षेपण करण्यात आले.‘ ‘‘नियोजित मुदत उलटूनही ‘मार्स एक्स्प्रेस अजूनही कार्यरत आहे.

Mars Express european space agencys first ever mars livestream
Alien mock signal from Mars to Earth : मंगळावरून पृथ्वीवर मिळाला सांकेतिक संदेश

त्याची कार्यक्षमताही अफाट असून सर्व अपेक्षेपेक्षाही त्याने अधिक काम केले आहे. हे यान आता खूप जुने झाले आहे. त्याने ओलांडल्या आहेत. जेवढी अपेक्षा ठेवण्यात आली होती, त्याच्या पाचपटीने जास्त काळ हे कार्यरत राहिले आहे,’’ अशी माहिती ‘युरोपीय स्पेस एजन्सी’ने एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. या मोहिमेचे अभियंते सायमन वूड म्हणाले,‘‘छायाचित्रे आणि अन्य माहिती साधारणपणे अवकाशयानात साठविली जाते आणि नंतर ती पृथ्वीवर पाठविली जाते.

यानाच्या प्रक्षेपणाला २० वर्षे पूर्ण

मंगळावरील भूविज्ञान, हवामान आणि वातावरण याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘मार्स एक्स्प्रेस’चे प्रक्षेपण २ जून २००३ रोजी मंगळाच्या दिशेने झाले. या ग्रहाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आणि भविष्यात तेथे मानवी वस्तीसाठी चाचपणी करणे, याबद्दल माहिती पुरविण्याचे कार्य हे यान करीत आहे. यानाचे ‘मारसिस’ हे रडार मंगळावरील पृष्ठभागावर आणि पृष्ठभागाखालील पाण्याचा शोध घेत आहे. या मोहिमेचा कालावधी २०२६ पर्यंत आहे.

मंगळाचे नेत्रदीपक छायाचित्र

‘मार्स एक्स्प्रेस’ने प्रक्षेपणाच्या २० वर्षे झाल्यानंतर मंगळाच्या पृष्ठभागावरील नेत्रदीपक रंगसंगती आणि रचनेविषयी नवी माहिती पाठविली आहे. यानाच्या उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यातील (एचआरएससी) माहितीच्या आधारे मंगळावरील आकर्षक रचना तयार झाली आहे. ‘एचआरएससी’ साधारणपणे ३०० किलोमीटर उंचीवरून मंगळाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढते. अंतराळयान त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेत मंगळाच्या सर्वांत जवळ पोहोचते.

त्यामुळे ५० किमी क्षेत्रापर्यंतच्या प्रतिमा काढता येतात. पण येथे सादर केलेल्या रचनेसाठी थोडा वेगळा दृष्टिकोन वापरला आहे. मंगळाचे व्यापक भाग चित्रित करण्यासाठी ‘एचआरएससी’ने सुमारे चार हजार ते दहा हजार किलोमीटर उंचीवरून ९० छायाचित्रे काढली असून अडीच हजार किलोमीटरचे क्षेत्र व्यापले आहे. संपूर्ण एकच मोठे दृश्‍य दिसण्यासाठी या सर्व प्रतिमा एकत्र करण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com