Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Australia sexual assault case: ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये ६१ महिलांच्या लैंगिक शोषणाचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. भारतीय मसाज थेरपिस्टला १३ वर्षे आणि १० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Australia sexual assault case

Australia sexual assault case

ESakal

Updated on

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे ६१ महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या मसाज थेरपिस्ट सुमित सतीश रस्तोगी याला १३ वर्षे आणि १० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, आरोपीचे वर्तन अनियंत्रित आणि शोषणकारी बनले होते. ३९ वर्षीय सुमित सतीश रस्तोगीने सुनावणीदरम्यान ९७ गुन्हे कबूल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com