esakal | पाकिस्तानात बसमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, चिनी इंजिनिअर्स ठार
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानात बसमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, चिनी इंजिनिअर्स ठार

पाकिस्तानात बसमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, चिनी इंजिनिअर्स ठार

sakal_logo
By
दीनानाथ परब

लाहोर: उत्तर पाकिस्तानात दहशतवादी हल्ला (pakistan terror attack) झाला आहे. IED द्वारे एका बसमध्ये बॉम्बस्फोट (bus blast) घडवण्यात आला आहे. या बसमध्ये चिनी इंजिनिअर्स (Chinese engineers) आणि पाकिस्तानी सैनिक (pakistan soldier) होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार चिनी इंजिनिअर्स आहे. (Massive blast on Pakistan bus kills eight several Chinese engineers among dead dmp 82)

अन्य जखमी असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. दासू धरणावर काम करणारे चिनी इंजिनिअर्स या बसमध्ये होते. जवळपास ३० इंजिनिअर्स आणि कामगार या बसमध्ये होते. मृताचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

हेही वाचा: मोनिका मोरेचे हात प्रत्यारोपण यशस्वी; दोन्ही हातांना संवेदना

"अप्पर कोहिस्तानमधून ही बस जात असताना हा स्फोट झाला. आठ जणांनी आपले प्राण गमावले" अशी माहिती हझारा रिजनच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली. इंजिनिअर्ससोबत दोन निमलष्करी दलाचे जवान होते, त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: इंग्लंडची 'विम्बल्डन फायनल' अन् मुंबई हायकोर्ट.. वाचा रंजक किस्सा

रस्त्यावर पेरण्यात आलेल्या उपकरणामुळे हा स्फोट झाला की, आधीपासून बसमध्ये स्फोटक ठेवण्यात आली होती, ते अजून स्पष्ट झालेलं नाही.

loading image