
Philippines Earthquake 6.9 Magnitude Tremor Destroys Buildings 60 Dead Many Injured Video Viral
Philippines Earthquake Viral Video: फिलिपाइन्स ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं हादरलंय. यामुळे देशाच्या काही भागांमध्ये विध्वंस झाला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून किमान ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अद्याप समजू शकलेला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे प्रंचड वित्त आणि जिवीतहानी झाली आहे. भूकंपाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. यात भूकंपावेळी घाबरून लोक सैरावैरा पळताना दिसतायत. तर रस्त्यावर वाहने थांबवून बाजुला उभा असणारे लोक दिसत आहेत.