
वेस्टर्न सुदानमधील मारा माउंटन परिसरात भीषण दुर्घटना घडलीय. भूस्खलनामुळे अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं असून यात किमान १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. गावातला फक्त एकच व्यक्ती वाचला असल्याची माहिती द सुदान लिबरेशन आर्मीने दिलीय. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून ३१ ऑगस्टच्या रात्री भूस्खलन झालं. यात मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्तहानी झालीय.