प्रसार माध्यमांनी बोरीस जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठविली; का ते वाचा सविस्तर

British-Newspaper
British-Newspaper

लंडन - सहकारी डॉमिनिक कमिंग्ज यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा निर्णय म्हणजे ब्रिटीश जनतेने केलेल्या त्यागाचा अपमान आहे. पंतप्रधानांसाठी ही परिक्षा होती, पण ते त्यात नापास झाले, अशी टीका विरोधी लेबर पार्टीचे नेतेकेईरस्ट्रॅमर यांनी केली.

लॉकडाउन असूनही कमिंग्ज यांनी लंडन ते डुरहॅम असा प्रवास सुमारे साडे चारशे किलोमीटर अंतराचा प्रवास दोन वेळा केला. त्यांना पालकांची तसेच कुटुंबियांची भेट घ्यायची होती. मुलाला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्याच्यावर उपचार व्हावेत यादृष्टिने त्यांनी ३१ मार्च रोजी प्रवास केल्याचे सिद्ध झाले. याशिवाय इतर किमान दोन वेळा त्यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. मुळात लॉकडाऊनचे उल्लंघन झाले असल्याने आणि तरिही जॉन्सन यांनी आपल्या मुख्य राजकीय सल्लागारावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रसार माध्यमांनी टीकेची झोड उठविली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षही पुढे सरसावले.

मुख्य म्हणजे जॉन्सन यांच्या कॉन्झर्व्हेटीव पार्टीतील सहकारी संसद सदस्यांनीहीकमिंग्ज यांच्या हकालपट्टीची मागणी केली.लिबरल डेमोक्रॅटीक पक्षाचे हंगामी नेते एड डॅव्ही यांनी सांगितले की, सरकारच्या सार्वजनिक आरोग्यविषयक संदेशाबाबत पुन्हाविश्वासार्हता निर्माण होण्यासाठी कमिंग्ज यांची हकालपट्टी अनिवार्य आहे. आपल्या सर्वांना घरी राहण्याची सूचना पंतप्रधानांनी दिली, पण त्यांच्या वरिष्ठ सल्लागारानेच याचा भंग केला. त्यामुळेच ते यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाहीत. हे अगदी उघड आहे.

स्कॉटलंडच्या अव्वल मंत्री निकोला स्ट्रुजिऑन यांनी जनहिताऐवजी राजकीय हितसंबंधांना जॉन्सन यांनी प्राधान्य दिल्याचा आरोप केला.सार्वजनिक आरोग्याचा संदेश आणि सल्ला यांच्यावरील लोकांचा विश्वास घडीला जितका महत्त्वाचा आहे तेपाहता याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, काही शास्त्रज्ञ आणि चर्चच्या प्रमुखांनीही जॉन्सन यांना धारेवर धरले. मॅंचेस्टरचे बिशप डेव्हिड वॉकर यांनी सांगितले की, कमिंग्ज यांच्या हकालपट्टीसह संबंधितांनी स्पष्टपणे खेद व्यक्त करायला हवा. तसे झाल्याशिवाय कोरोना निर्मुलनासाठी मंत्र्यांच्या साथीत चर्चने कसे काम करायला हवे यावर आम्ही विश्वास ठेवू शकणार नाही.

वर्तनशास्त्राबाबत सरकारच्या सल्लागार गटाचे सदस्य प्रा. स्टीफन रेईशर यांनी सांगितले की, आपण सारे एक होऊन महामारीचा मुकाबला करतो आहोत या भावनेला अशा नियमांतील दुटप्पीपणामुळे तडा जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com