हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनची (एचसीक्‍यू) वैद्यकीय चाचणी स्थगित

hydroxychloroquine
hydroxychloroquine

जिनीव्हा - कोरोनावरील औषध म्हणून हायड्रॉक्‍सी-क्‍लोरोक्वीनची (एचसीक्‍यू) वैद्यकीय चाचणी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्थगित केली आहे. रुग्णाच्या सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला. जगातील अनेक देशांत ‘एचसीक्‍यू’ची वैद्यकीय चाचणी घेण्यात येत होती.

‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी ‘व्हर्च्युअल’ पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. एकता चाचणी (सॉलीडॅरीटी ट्रायल) अंतर्गत अनेक देशांतील रुग्णालयांनी पर्याय म्हणून समोर आलेल्या विविध औषधांची चाचणी घेण्यासाठी रुग्णांची नोद केली होती. या उपक्रमाच्या कार्यकारी गटाला चाचणी थांबविण्याची सूचना 
देण्यात आली. 

या चाचणीचा भाग असलेल्या इतर गोष्टी सुरु आहेत. आपोआप प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या किंवा मलेरियासारख्या रोगांवरील उपचारात ‘एचसीक्‍यू’चा वापर नेहमीसारखा सुरक्षित असल्याचे घेब्रेयेसस यांनी आवर्जून नमूद केले.
‘एचसीक्‍यू’ता साधारणपणे संधीवातावर उपयोग होतो, मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह काही नामवंतांच्या पाठिंब्यामुळे अनेक देशांनी या औषधाची घाऊक प्रमाणावर खरेदी केली.

महत्त्वाचे निष्कर्ष असे...
‘दी लॅन्सेट’ या नामवंत साप्ताहिक मेडीकल जर्नलतर्फे यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यातील निष्कर्ष...
कोरोनावर ‘एचसीक्‍यू’चा उपयोग नाही
उलट गंभीर दुष्परिणाम उद्भवू शकतात
प्रामुख्याने ह्रदयाचे ठोकेअचानक कमी-जास्त होऊ शकतात
या औषधाच्या वापराने रुग्णाच्या मृत्युची शक्‍यता वाढते

९६ हजार रुग्णांचा अभ्यास...
जगभरातील शेकडो रुग्णालयांतील ९६ हजार रुग्णांच्या माहितीची छाननी
कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाही याचा उपयोग नाही
रुग्णांच्या सुरक्षाविषयक आकडेवारीचा आढावा
‘आकडेवारी सुरक्षा देखरेख मंडळ’ यासाठी सक्रिय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com