esakal | भारतात यायचंय, पण..;चोक्सीचे सुरक्षा यंत्रणांवर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

mehul choksi fraud in Nashik

कर्जबुडवा फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडाला पोहोचला आहे. येथे पोहोचल्यानंतर त्याने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

भारतात यायचंय, पण..;चोक्सीचे सुरक्षा यंत्रणांवर गंभीर आरोप

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कर्जबुडवा फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडाला पोहोचला आहे. येथे पोहोचल्यानंतर त्याने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय एजेन्सींनी त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच बँक घोटाळ्याप्रकरणी सहकार्यासाठी नेहमी तयार असल्याचं तो म्हणाला आहे. डोमनिका उच्च न्यायालयाने चोक्सीला उपचारासाठी जामीन मंजूर केला. तसेच त्याला अँटिग्वाला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Mehul Choksi alleges kidnapping attempt by Indian agencies claims he was ready to cooperate)

चोक्सी म्हणालाय की, 'निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मला भारतात येण्याची तीव्र इच्छा आहे. पण, आरोग्य समस्यांमुळे मी तसं करु शकत नाही. तसेच भारतातील सुरक्षेबाबत मला काळजी वाटते.' चोक्सी खासगी विमानाने अँटिग्वा आणि बारबुडाला पोहोचला होता. याठिकाणी त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्याच्या प्रकृतीबद्दल आणि हालचालीबाबत त्याला डोमनिका अधिकाऱ्यांना माहिती देत राहावी लागणार आहे.

हेही वाचा: डेल्टा प्लस कमी फैलावणारा; ‘इन्साकॉग’चा दावा

मी अँटिग्वा आणि बारबुडाला परत आलो असलो तरी छळाचे माझ्या शरीरावर, मनावर, मानसिकतेवर मोठे परिणाम झाले आहे. माझे सर्व व्यवसाय आणि माझी मालमत्ता जप्त केल्यानंतरही भारतीय सुरक्षा एजेन्सी माझ्या अपहरणाचा प्रयत्न करत असल्याचा मला विश्वास पटत नाही. एजेन्सींना अँटिग्वा येथे येऊन चौकशी करण्यास मी सहमती दर्शवली आहे, असं चोक्सी एएनआयशी बोलताना म्हणाला.

हेही वाचा: मनाचिये वारी : हा सुखसोहळा स्वर्गी नाही!

एजेन्सींना मी अनेकदा सांगितलं की त्यांनी येथे येऊन माझी चौकशी करावी. माझी प्रकृती ठीक नाही. मला आता प्रवास करता येत नाही. मी नेहमीच सहकार्यासाठी तयार आहे, पण एजेन्सीचे अमानवीय कृत्य कधीही स्वीकाराले जाऊ शकत नाही. त्यांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न चालवला आहे. असे असले तरी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मला परत यायचं आहे. पण, आरोग्य मला साथ देत नाही. गेल्या 50 दिवसात ती अधिक बिघडली आहे. भारतातील सुरक्षेबाबत मला शंका आहे. चांगल्या स्थितीत मी भारतात येईन असं वाटत नाही, असंही चोक्सी म्हणाला.

loading image