एक सदस्यीय आयोगामार्फत शरीफ यांची चौकशी

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद - पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर पनामा पेपर्सप्रकरणी झालेल्या आरोपांची चौकशी एक सदस्यीय आयोगामार्फत करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, शरीफ यांच्या कुटुंबीयांनी या आरोपांना लेखी प्रत्युत्तर न दिल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. विदेशांमध्ये बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप आहे. या प्रकरणी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यापैकी नवाज शरीफ आणि त्यांच्या जावयाने आपले म्हणणे सादर केले असले तरी त्यांची मुलगी मरियम आणि मुले हुसेन व हसन यांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही.

इस्लामाबाद - पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर पनामा पेपर्सप्रकरणी झालेल्या आरोपांची चौकशी एक सदस्यीय आयोगामार्फत करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, शरीफ यांच्या कुटुंबीयांनी या आरोपांना लेखी प्रत्युत्तर न दिल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. विदेशांमध्ये बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप आहे. या प्रकरणी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यापैकी नवाज शरीफ आणि त्यांच्या जावयाने आपले म्हणणे सादर केले असले तरी त्यांची मुलगी मरियम आणि मुले हुसेन व हसन यांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. याबद्दल न्यायालयाने आज नाराजी व्यक्त केली. या तिघांनी आपले म्हणणे सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: a member of the commission inquiry to mawaz sharif