जाहिरातींचा पर्याय ‘मेटा’ हटविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

meta

जाहिरातींचा पर्याय ‘मेटा’ हटविणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : वंश, जात, राजकीय संबंध, धर्म किंवा लिंग या मुद्यांना लक्ष्य करणाऱ्या संवेदनशील जाहीरातींचे पर्याय काढून टाकणार असल्याचे ‘फेसबुक’ची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने जाहीर केले आहे. सध्या ‘फेसबुक’वर एखाद्या व्यक्तीने एखाद्या राजकीय पक्षामध्ये, धर्मामध्ये किंवा संघटनेमध्ये रस दाखविल्यास त्याच्याशी संबंधित जाहीरातींचा त्या व्यक्तीवर मारा होतो.

त्या व्यक्तीची ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ किंवा ‘मेटा’ची मालकी असलेल्या इतर सोशल मीडियावरील ॲक्टिव्हिटीचा आढावा घेऊन या जाहीराती त्या व्यक्तीला पाठविल्या जातात. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीने समलिंगी विवाहामध्ये रस दाखविल्यास त्या व्यक्तीला या विषयाशी संबंधित जाहीराती दिसू लागतात. अशा जाहीराती पाठविण्याचा पर्याय जाहीरातदारांना दिलेला आहे.

हेही वाचा: नवाबभाई वेल डन : मुख्यमंत्री ठाकरे

मात्र, या पर्यायाचा त्यांच्याकडून गैरवापर होण्याची शक्यता असल्याने आणि तशा तक्रारीही आल्याने हा पर्याय बंद करणार असल्याचे ‘मेटा’ने सांगितले. हा पर्याय काढून टाकल्याने उत्पन्न घटणार असले तरी हा निर्णय विचारपूर्वक घेतला असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

loading image
go to top