कॅनडामध्ये आकाशात दिसली मोठी पेटलेली उल्का; अण्वस्त्र हल्ल्याच्या भीतीने घाबरगुंडी

canada
canada

ओटावा : कॅनडातील अल्बर्टामध्ये लोकांना अचानकच आकाशात एक निळा प्रकाश जोरदारपणे चमकत जाताना दिसून आला. देशावर एखादा अण्वस्त्र हल्ला झाला की काय असं अनेक लोकांना वाटून त्यांची घाबरगुंडी उडाली. मात्र, नंतर समजलं की, ती एक उल्का होती. मात्र, ती उल्काच इतकी मोठी होती की ती अमेरिकेच्या सीमेपासून आर्कटीक सर्कलपर्यंत पहायला मिळाली. या भागात असलेल्या अनेक सिक्यूरिटी कॅमेऱ्यांमध्ये ती पहायला मिळाली. 

इंटरनॅशनल मीटियर ऑर्गनायझेशनकडे उल्कापिंड बघितल्याच्या जवळपास 300 हून अधिक कॉल्सची नोंद केली गेली.  उल्कापिंड या धुमकेतूचाच भाग असतात. मात्र एखाद्या कारणाने धुमकेतूपासून तुटून त्याचा छोटा भाग निखळतो ज्याला आपण meteroid असं म्हणतो. जेंव्हा हे उल्कापिंड पृथ्वीच्या जवळ पोहोचतात तेंव्हा वायुमंडलाच्या जवळ आल्याने घर्षणाने त्याला आग लागते. हे दृश्य आपल्याला एखाद्या तुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणेच दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात तो तारा नसतो. 

सगळ्याच उल्का याप्रमाणे जळतच पृथ्वीवर येतात असं नाही. तर काही मोठ्या आकाराच्या उल्का न जळताच तशाच पृथ्वीवर येऊ शकतात. तेंव्हा त्यांना meteorite म्हटलं जातं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com