पॉपस्टार लेडी गागाच्या दोन कुत्र्यांची चोरी; माहिती देणाऱ्याला कोट्यवधींचं बक्षीस

lady gaga
lady gaga

नवी दिल्ली : हॉलिवूडमधील स्टार सिंगर लेडी गागाच्या कुत्र्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. काही बदमाशांनी स्टार पॉप सिंगर गागाच्या कुत्र्याची देखभाल करणाऱ्या तसेच त्याला फिरायला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला गोळी मारली आहे. त्यानंतर फ्रेंच बुल डॉग प्रजातीच्या दोन कुत्र्यांना घेऊन हे चोर फरार झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील हॉलिवूड शहरामध्ये काही बदमाश सशस्त्र इसमांनी हा गुन्हा केला आहे. त्यानंतर गायिका लेडी गागाने या घटनेस जबाबदार लोकांची माहिती देण्यास 5 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी 65 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. 

लेडी गागाची डॉग वॉकर रायन फिशरला बुधवारी रात्री गोळी मारण्यात आली. या घटनेत ती अत्यंत वाईटरित्या जखमी झाली. लॉस एंजलिस पोलिसांमधील रॉबरी-होमिसाइड डिव्हीजनचे कमांडींग ऑफिसर कॅप्टन जोनाथन यांच्या म्हणण्यानुसार, डॉग वॉकर लेडी गागाच्या तीन कुत्र्यांना फिरवत होता. त्यावेळी हल्ला झाल्यावर एक कुत्रा पळून गेला. त्या कुत्र्याला सुरक्षितरित्या पकडून ठेवलं गेलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

लेडी गागाचे जे कुत्रे चोरीला गेले आहेत त्यांची नावे कोजी आणि गुस्ताव अशी आहेत. घटनास्थळावरुन पळून जाणाऱ्या तिसऱ्या कुत्र्याचे नाव एशिया असं आहे. सध्या या दोन चोरी गेलेल्या कुत्र्यांसदर्भातील माहितीसाठी KojiandGustav@gmail.com नावाचा इमेल आयडी जाहीर करण्यात आला आहे. सध्या पॉप सिंगर लेडी गागा एका फिल्मच्या शुटींगसाठी रोममध्ये आहे. सोशल मीडियावर अधूनमधून लेडी गागा आपल्या या आवडत्या कुत्र्यांचे फोटो पोस्ट करत रहायची. 

पोलिसांच्या एका वक्तव्यात म्हटलं गेलंय की, दोन व्यक्तींनी वाहनातून बाहेर येऊन पीडित डॉग वॉकरला बंदूकीचा धाक दाखवून कुत्र्यांना फिरवू देण्याची मागणी केली. त्यावेळी डॉग वॉकरने या दोन आरोपींसोबत झटापट केली आणि त्यातील एका आरोपीने या डॉग वॉकरवर हल्ला केला. अद्यापतरी या घटनेमागचं कारण समजू शकलं नाहीये. 
जे दोन कुत्रे चोरीला गेले आहेत ते दोन्हीही फ्रेंच बुलडॉग हे महाग आणि प्रतिष्ठित जातीचे कुत्रे मानले जातात. तसेच त्यांच्या किंमती देखील हजारो डॉलर इतक्या असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com