मेक्सिकोत बस घरावर आदळून भीषण अपघात; 19 जणांचा मृत्यू, 32 प्रवासी जखमी

Mexico
Mexicoesakal
Summary

मेक्सिकोमध्ये मोठा बस अपघात झाला असून त्यात 19 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

Bus Crashed Into House in Mexico : मेक्सिकोमध्ये मोठा बस अपघात झाला असून त्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. हे लोक शुक्रवारी धार्मिक स्थळाकडे जात होते. त्यानंतर बस एका घरावर आदळल्याने हा अपघात झाला. मध्य मेक्सिकोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, की सर्व बळी हे पश्चिमेकडील मिचोआकान (Michoacan) राज्यातील रहिवासी आहेत. हे लोक कॅथोलिक चर्चमध्ये जात होते.

Mexico
Sakal Survey : पालघरात बहुजन विकास आघाडीचाच वरचष्मा

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून धावणारी ही बस एका घरावर आदळल्याने हा अपघात झाला. इतर 32 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलंय. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. बसमधील लोक धार्मिक स्थळाच्या दिशेने जात होते. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघातामागील कारण अद्याप सांगितलेलं नाही. स्थानिक मीडियानं या अपघाताचे फोटो जारी केले असू सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Mexico
Sakal Survey : ठाण्यात खरी लढाई भाजप-शिवसेनेतच

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले, की शुक्रवारी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस मेक्सिकोतील एका घरावर आदळली. बस पश्चिम मिचोआकन येथून चलमाकडे जात होती. शतकानुशतके रोमन कॅथलिक यात्रेकरू या शहराला भेट देत असतात. मात्र, असा अपघात यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. मृत आणि जखमींच्या ओळखीशी संबंधित कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही. तसेच जखमींची प्रकृती सध्या कशी आहे, हे सांगण्यात आलेलं नाही.

Mexico
मुंबईच्या गुंडगिरीला 'सातारी हिसका' सोसणार नाही : शिवेंद्रराजे

सोनोरातही भीषण अपघात

या वर्षी सप्टेंबरमध्ये उत्तरेकडील सोनोरा राज्यात बस-ट्रकच्या धडकेत 16 जण ठार, तर 22 जण जखमी झाले होते. एप्रिलमध्ये सोनोरा येथे दोन बसची टक्कर झाली, यात किमान 16 लोकांचा मृत्यू झाला. या बस कामगारांना खाणीच्या दिशेने घेऊन जात होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com