मेक्‍सिकोस शक्तिशाली भूकंपाचा धक्का; पाच मृत्युमुखी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

या भूकंपाच्या पार्श्‍वभूमीवर मेक्‍सिको, ग्वाटेमाला, एल साल्व्हाडोर, कोस्टारिका, निकारागुआ, पनामा आणि होंडुरास या देशांना त्सुनामीचा फटका बसण्याचा इशारा देण्यात आला आहे

मेक्‍सिको - अमेरिका खंडातील मेक्‍सिको देशास आज (शुक्रवार) शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता तब्बल 8.1 रिश्‍टर स्केल इतकी होती.

मेक्‍सको शहरास सुमारे मिनिटभर या भूकंपाचे धक्के जाणवले. या शक्तिशाली भूकंपामुळे इमारती हादरल्या; तसेच अनेक नागरिक प्राणभयाने रस्त्यांवर पळाले. या भूकंपामध्ये किमान पाच नागरिकांचा मृत्यु झाला. भूकंपाचे केंद्रस्थान प्रशांत महासागरात सुमारे 70 किमी खोलीवर असल्याची माहिती अमेरिकेच्या भूसर्वेक्षण संस्थेने दिली आहे.

या भूकंपाच्या पार्श्‍वभूमीवर मेक्‍सिको, ग्वाटेमाला, एल साल्व्हाडोर, कोस्टारिका, निकारागुआ, पनामा आणि होंडुरास या देशांना त्सुनामीचा फटका बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title: mexico earthquake