Bar Fire : बारमधून बाहेर काढलं म्हणून आला राग, तरुणाने थेट बिल्डिंगला लावली आग; ११ जणांचा बळी

बारमधील महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं होतं..
Mexico Bar Fire
Mexico Bar FireeSakal

मेक्सिकोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बारला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मेक्सिकोच्या उत्तर भागात असणाऱ्या सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात ही दुर्दैवी घटना घडली.

शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याबद्दल त्याला बारमधून बाहेर हाकलण्यात आलं होतं. याचा राग मनात ठेऊन त्याने थेट बारच्या इमारतीलाच आग लावली. यामुळे ही दुर्घटना घडली. (Mexico Bar Fire)

Mexico Bar Fire
Bangladesh accident: बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू

सोनोरा स्टेटच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या घटनेवेळी आरोपी भरपूर नशेत होता. तसंच, त्याला बारमधील महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल बाहेर काढण्यात आलं होतं, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. बारला आग लावण्यासाठी या व्यक्तीने मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर केल्याचंही सांगण्यात येत आहे.

या व्यक्तीने बारच्या दरवाज्यावर हे केमिकल फेकले, आणि त्याला आग लावली. यानंतर ही आग वेगाने पसरून संपूर्ण बार खाक झाला. मृतांमध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. यासोबतच, आणखी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या दुर्घटनेत बळी गेलेली एक महिला अमेरिकेची नागरिक होती. तर, एका १७ वर्षांच्या मुलीचाही यात बळी गेल्याचं समोर आलं आहे. स्टेट अटॉर्नी जनरल गुस्ताव्हो रोम्युलो सालस यांनी याबाबत माहिती दिली. तसंच, या आरोपीला अटक करण्यात आल्याचं शहराच्या महापौरांनी स्पष्ट केलं.

Mexico Bar Fire
Benjamin Netanyahu Hospitalized : इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू रुग्णालयात दाखल; पेसमेकर बसवण्यासाठी होणार शस्त्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com