

Torani company success story - AI image
esakal
New Delhi: मायक्रोसॉफ्टकडून सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर दिल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी अमेरिकेतील टोरानी (Torani) कंपनीने मात्र कितीही मोठे संकट आले तरी कर्मचाऱ्यांची बाजू घेण्याचे धोरण ठेवून वेगळा आदर्श घालून दिला आहे. कंपनीच्या १०१ वर्षांच्या इतिहासात एकाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आलेले नाही. आर्थिक संकट असो किंवा व्यवसायातील मंदी, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्याला प्राधान्य देण्याची या कंपनीची भूमिका म्हणूनच सध्याच्या काळात चर्चेचा विषय ठरली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा