esakal | ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे दोन कंपन्यांतील 'डील'' फिस्कटली!
sakal

बोलून बातमी शोधा

Tik tok, America

अमेरिकन सरकारची TikTok संदर्भातील भूमिका स्पष्ट होणार नाही तोपर्यंत दोन्ही कंपन्यामधील अखेरच्या टप्प्यात आलेला व्यवहाराला अंतिम स्वरुप प्राप्त होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे दोन कंपन्यांतील 'डील'' फिस्कटली!

sakal_logo
By
सुशांत जाधव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप असलेल्या TikTok वर बंदी घालण्याचे संकेत दिल्यानंतर मायक्रोसॉफ्टने सावध पवित्रा घेतलाय. TikTok खरेदी करण्यासाठी बाइटडान्स कंपनीसोबत सुरु असलेली चर्चा मायक्रोसॉफ्टने थांबवली आहे. त्यामुळे भारतात या अ‍ॅपच्या पुनरागमानाला ग्रहण लागल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसते. ट्रम्प यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना TikTok ला हद्दपार करण्याचे संकेत दिले होते. युट्यूब आणि फेसबुक या लोकप्रिय माध्यमांसमोरील संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून TikTok कडे पाहिले जाते.  

पाकिस्तानची बालीशपणाची हद्द; काश्मिर ताब्यात घेण्याचे पाहतोय स्वप्न

द वाल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकार TikTok संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार याकडे बाइटडान्स आणि  माइक्रोसॉफ्ट दोन्ही कंपन्याचे लक्ष ठेऊन आहेत. अमेकिन राष्ट्राध्यक्षांनी TikTok वरील बंदीचे संकेत दिल्यानंतर संबंधित कंपनीने आगामी तीन वर्षांत अमेरिकेत 10 हजार लोकांना रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली होती.  TikTok खरेदीसंदर्भात मायक्रोसॉफ्ट आणि बाइटडान्स यांच्यातील बोलणी अंतिम टप्प्यात होती. सोमवारी डील फायनल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण ट्रम्प सरकारच्या संभ्रमित भूमिकेमुळे मायक्रोसॉफ्टने सावध पवित्रा घेतलाय.

देशात फक्त रिलायन्सलाच 'अच्छे दिन'; जिओच्या नफ्यात 183 टक्क्यांनी वाढ

अमेरिकन सरकारची TikTok संदर्भातील भूमिका स्पष्ट होणार नाही तोपर्यंत दोन्ही कंपन्यामधील अखेरच्या टप्प्यात आलेला व्यवहाराला अंतिम स्वरुप प्राप्त होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. डेटा सुरक्षितेच्या मुद्यावरुन भारताने चिनी अ‍ॅपला दणका दिला होता. त्यानंतर अमेरिका सरकारही चीनची कोंडी करण्याच्या दिशेने पावले टाकताना दिसते. TikToK ने आपली बाजू मांडताना युजर्सचा डेडा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय चिनी सकारला कोणताही डेटा पूर्वत नसल्याची माहितीही कंपनीने दिली होती.