मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांचा संचालक पदाचा राजीनामा

वृत्तसंस्था
शनिवार, 14 मार्च 2020

मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा आज (ता. १४) राजीनामा दिला. गेट्स यांना सामाजिक कार्यात प्राधान्याने काम करायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले.

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा आज (ता. १४) राजीनामा दिला. गेट्स यांना सामाजिक कार्यात प्राधान्याने काम करायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले. संचालक मंडळाचा राजीनामा दिला असला तरी, गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतील. 

कोरोनाचे सावट : विषाणूंचा ‘दंश’काळ

'मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांनी आपला वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे. यामुळे गेट्स यांनी संचालक मंडळाचा राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतला आहे,' अशी माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे गेट्स मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाले असून आता ते पूर्णवेळ सामाजिक कार्यात आपला वेळ घालवतील. १९७५मध्ये पॉल अॅलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती, त्यानंतर २००० पर्यंत त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी काम केले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'बिल गेट्स यांच्यासोबत काम करायला मिळणं, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम झटत राहू. त्यांचा सल्ला हा कंपनीसाठी कायमच फयद्याचा असेल. सर्व संचालक मंडळाला त्यांनी मार्गदर्शन केले आहे.' असं सीईओ सत्या नडेला यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळात आता १२ सदस्य आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Microsoft Co Founder Bill Gates Resigns From Board Of Directors