US-Iran War: संघर्ष पुन्हा भडकला! अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; १४ जण ठार, ७८ लोक जखमी, पाच प्रांतांवर बॉम्बहल्ले

US Airstrikes on Iran: चाबहार आणि कोनारकमध्ये १० स्फोटांचे आवाज ऐकू आले. अबू मुसा बेटावरही दहा स्फोट झाले. बंदर अब्बासमध्ये आठ आणि सिरिकमध्ये तीन स्फोट झाले. चाबहारमधील एका रुग्णालयावर शस्त्रास्त्रांचा मलबा पडला.
US Airstrikes on Iran

US Airstrikes on Iran

ESakal

Updated on

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. मंगळवार, ७ जुलै रोजी, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तीन जहाजांवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणवर हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, गेल्या दोन दिवसांत अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये १४ जण ठार झाले असून ७८ जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com