मायलीच्या घरी लक्ष्मीपूजन 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

लॉस एंजल्स : अवघी अमेरिका "सुपर बाऊल'मध्ये रंगली असताना प्रसिद्ध गायिका मायली सायरस तिच्या घरात चक्क "लक्ष्मी पुजा' करण्यात रमली होती. "इन्स्टाग्राम'वर मायलीने लक्ष्मी पुजेचे फोटो शेअर केले आहेत. 
"फळांचा बाऊल..."सुपर'वर' अशी ओळ तिने "इन्स्टाग्राम'वर फोटोखाली लिहिली आहे. कॅलिफोर्नियातील मॅलिबू येथील आपल्या निवासस्थानाची सजावट भारतीय पद्धतीने केल्याचा फोटोही तिने शेअर केला आहे. चोविस वर्षे वयाच्या मायलीला हिंदू संस्कृती अनोळखी नाही. 

बोटावर "कर्म' आणि मनगटावर "ओम' असे टॅटू काढल्याने आधीही मायली भारतीय माध्यमांमध्ये चर्चेत आली होती. तिच्या 2015 च्या "मिल्की मिल्की मिल्की' अल्बममध्ये बुद्ध धर्माचे संदर्भ आले आहेत. 
मायलीच्या या पोस्टमुळे सध्या तिने अनेकांचे लक्ष वेधले आहे. धनधान्य-संपत्तीचे प्रतीक मानले जाणाऱ्या लक्ष्मी देवीच्या फोटोसोबतच मायलीने पूजेसाठी तिच्या काही धार्मिक गुरुंचाही फोटो शेजारी ठेवल्याचे छायाचित्रात दिसते. पाच फळांपासून ते शिऱ्याच्या प्रसादापर्यंत सर्व गोष्टींपर्यंत सर्व नैवैद्याची तयारी यांत दिसते. दुसऱ्या फोटोत पूजेची खोली 
गुलाबाच्या पाकळ्या आणि भारतीय बैठक करून सजवलेली दिसते. मायलीने ही पूजा अचानक करण्याचा मानस मात्र नेमका समजलेला नाही. मायलीला हिंदू धर्माबद्दल प्रचंड आकर्षण असल्याचे याआधीही तिच्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्ट्‌सद्वारे समजते. त्यामुळे मायली सध्या चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या या अनोख्या लक्ष्मीपूजनामुळे. 
 
Web Title: Miley Cyrus Chooses Lakshmi Puja Over Super Bowl

फोटो गॅलरी