Corona Updates: आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी नियमावली जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New rules of Health Ministry about international Arrivals
आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी नियमावली जाहीर | International Traveling

Corona Updates: आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी नियमावली जाहीर

Corona Updates: ओमिक्रॉन (Omicron)आणि कोरोनाच्या तिसऱ्या (Corona) लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही निर्बंध घातले होते. परंतु आता मात्र या नियमांमध्ये हळूहळू शिथिलता येत आहे. केंद्रसरकारने (Central Government) विदेश प्रवास करून आलेल्या लोकांसाठी (International Arrivals) नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) 14 फेब्रुवारीपासून लागू होणार्‍या आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही निर्बंध घातले होते. कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या काही देशांना भारताने जास्त जोखीम असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकले होते. परंतु आता मात्र जोखीम असलेल्या देशांची श्रेणी तसेच अन्य देश असा फरक नसणार आहे. आधीच्या नियमांप्रमाणे आगमनानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन होणं अनिवार्य होतं, परंतु आता त्याऐवजी 14 दिवस स्व-निरीक्षणाची शिफारस केली गेली आहे.

हेही वाचा: कोरोना नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी; आरोग्यमंत्र्यांचे शाळांना आवाहन

नव्या नियमांनुसार ज्यांना भारतात यायचं असेल, त्यांना सुविधा पोर्टलवर जाऊन मागील १४ दिवसांची माहिती तसेच इतर काही माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना 72 तासांपूर्वी RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रही अपलोड करावे लागणार आहे.

परदेशातून भारतात येऊ पाहणाऱ्यांना तिकीट देण्यापूर्वी येथील कोविड नियमांची माहिती द्यावी अशा सूचना संबंधित एअरलाईन्स तसेच ट्रॅव्हल एजन्सीजना दिल्या गेल्या आहेत. विमान पायलट आणि क्रू मेंबर्सनाही कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाला कोविड लक्षणं आढळली तर कोविड प्रोटोकॉलनुसार त्याची माहिती द्यावी लागणार असून त्याला आयसोलेट केलं जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने 14 फेब्रुवारीपासून लागू होणार्‍या आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Web Title: Ministry Of Health Issues Revised Guidelines For International Arrivals To Come In Effect From 14th Feb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top