
कोरोना नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी; आरोग्यमंत्र्यांचे शाळांना आवाहन
महाराष्ट्रासहित देशभरात कोरोनाने विळखा घातलाय. अशात राज्यातील कोरोना रुग्णसंख्या जरा आटोक्यात आल्याने महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. ते जालन्यात बोलत होते.
हेही वाचा: भारताच्या सैन्यातील नवी टेक्नोलॉजी पाहिलीय का? DRDOचा हा व्हिडीओ पाहाच
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले होते त्यामुळे विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र परिस्थिती बऱ्या प्रमाणात आटोक्यात आल्याने २० दिवसानंतर पुन्हा एकदा शाळा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावर आरोग्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांमध्ये लक्षणं आढळल्यास चाचणी करावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात आहे.
हेही वाचा: पश्चिम बंगालमध्ये 'नियोजन आयोग' स्थापणार; ममतांची घोषणा
लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मच्या एका सर्वेक्षणातुन असे समोर आले की ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिलाय. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, "पालकांनी काळजी न करावी.जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, हा शाळा सुरू करण्यामागील प्रमुख हेतू आहे."
मुळात सोमवारपासून सुरु होत असलेल्या शाळांवर कोरोनाचे सावट पडायला नको नाहीतर पुन्हा एकदा शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास शिक्षण विभाग आणि पालक कमी पडायला नको.
Web Title: Rajesh Tope Appeal To Schools To Take Care Of Students
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..