बांगलादेश: पतीशी फोनवर बोलतानाच "तिने' घेतला गळफास

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

तिच्या आत्महत्येचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नसले; तरी वैवाहिक आयुष्यामधील समस्यांमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

ढाका - बांगलादेशमधील एका 22 वर्षीय मॉडेलने तिच्या पतीबरोबर "व्हिडिओ कॉल' सुरु असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. रिसिला बिंते असे या तरुणीचे नाव आहे. रिसिला ही एका तीन वर्षीय मुलीची आईही होती.

तिच्या आत्महत्येचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नसले; तरी वैवाहिक आयुष्यामधील समस्यांमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तिने गळफास घेतल्याची बातमी कळताच नातेवाईकांनी तिच्या घराकडे धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिला वाचविणे शक्‍य झाले नाही.

Web Title: Model hanged herself in Bangladesh during a video call with her husband

टॅग्स