मॉडर्नाचा अंतरिम अहवाल नोव्हेंबरमध्ये अपेक्षित

Moderna
Moderna

लंडन- कोरोनावर लस बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मॉडर्ना या अमेरिकी कंपनीला नोव्हेंबर महिन्यात चाचण्यांचा अंतरिम अहवाल अपेक्षित आहे.

जगात दिडशेहून जास्त लशींची संशोधन आणि निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. त्यात मॉडर्नाचा समावेश असून वर्षाअखेरपर्यंत दोन कोटी डोसचे उत्पादन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आले होते. अंतिम टप्प्यातील अभ्यासासाठी तीस हजार स्वयंसेवकांची नोंदणी करण्याचे नियोजन होते. त्यावेळी 25 हजार 296 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार अमेरिका सरकार डिसेंबरमध्ये आणीबाणीच्या कारणासाठी या लशीच्या वापरास मंजुरी देऊ शकते. बॅन्सल यांनी या वृत्तपत्रास सांगितले होते की, अंतरिम अहवालासाठी पुरेशा अभ्यासाचे पाठबळ लागते, ज्यासाठी जास्त काळ लागतो. त्यामुळे सरकारची मंजुरी कदाचित पुढील वर्षाच्या आधी मिळू शकणार नाही. संपूर्ण अभ्यासातील 53 व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसतील तेव्हा लशीची परिणामकारकता स्पष्ट होईल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणीबाणीच्या वापरासाठी लवकरात लवकर ठरविले तरी 25 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करणे शक्य नसेल असे बॅन्सेल यांनी फायनान्शियल टाइम्सला सांगितले होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पहिला परीक्षण अहवाल पुढील महिन्यात अपेक्षित आहे, पण नेमका आठवडा सांगता येणार नाही. रुग्णांची संख्या, स्वयंसेवक आजारी पडण्याचे प्रमाण यावर ते अवलंबून आहे. उत्पादनात वाढ करणे हे आव्हान असेल. एका घटकाची उणीव असली तरी लस बनविता येणार नाही.
- स्टीफन बॅन्सेल, मॉडर्नाचे सीइओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com