
पॅरिस : भारत आणि फ्रान्स यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्णय घेतला. इतर जागतिक व्यासपीठांमध्ये आणि प्रकल्पांमध्येही एकमेकांना सहकार्य करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.