पाकमध्ये शीख युवतीचे अपहरण करुन धर्मांतर अन्...

वृत्तसंस्था
Wednesday, 24 June 2020

एका सोळा वर्षीय शीख युवतीचे अपहरण करून तिच्या मनाविरोधात धर्मांतर करून एका मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिल्याची घटना येथे घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कराची (पाकिस्तान): एका सोळा वर्षीय शीख युवतीचे अपहरण करून तिच्या मनाविरोधात धर्मांतर करून एका मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिल्याची घटना येथे घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चीननंतर पाकला खुमखुमी; जवान हुतात्मा

युवतीच्या नातेवाईकांनी सांगितले की, लक्ष्मी कौर (वय 16) हिचे जाकोबाबाद येथून 17 जून रोजी अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर तिचे मनाविरोधात धर्मांतर केले. धर्मांतरानंतर तिचे वझिर हुसैन चांदियो या मुस्लिम युवकासोबत विवाह लावून दिला. याबाबत तक्रार दाखल केली आहे. अपहरण करणाऱयांना आणि वझिरला शिक्षा होण्याची मागणी करण्याबरोबरच या घटनेचा शीख नागरिकांनी निषेध केला आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या शीख नागरिकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले होते.

भारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...

दरम्यान, पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासातील दोन भारतीय अधिकाऱयांचे अपहरण केले होते. दोघांची 50 तासानंतर सुटका करण्यात आली होती. मात्र, 50 तासांमध्ये त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात होता. त्याबाबत भारताने वारंवार पाकिस्तानकडे सूचना मांडल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानने उलट भारतीय कर्मचाऱ्यांना 'हिट अँड रन' प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. सुटका झाल्यानंतर दोन्ही अधिकार भारतात परतले आहेत.

पाक पोलिसांनी घाणेरडे पाणी पाजले; रॉडने मारले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan 16 year old sikh girl was abducted and converted muslim