काहीच काम न करण्यासाठी दिले जातायत 1 लाख 41 हजार रुपये

germany
germany

बर्लिन - तुम्हाला सांगितले की कोणतेही काम न करता पैसे मिळतील तर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण काम न करता कोणी का पैसे कसे देईल. पण हे खरं असून हे घडतंय ते जर्मनीतील एका विद्यापीठामध्ये. इथं काम न करता तुम्हाला 1 लाख 41 हजार रुपये दिले जात आहेत. द गार्डियन या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, या विद्यापीठामध्ये काहीही न करण्याचे पैसे दिले जात आहेत. 

जर्मनीच्या 'हॅम्बर्ग' मधील 'युनिव्हर्सिटी ऑफ फाइन आर्ट्स  (University of Fine Arts, Hamburg) या विद्यापीठामध्ये  'idleness grant” ऑफर देण्याच्या विचारात आहे. यामध्ये कसलेही काम न करता विद्यापीठ विद्यार्थ्यांना 1600 युरो म्हणजे भारतीय चलनामध्ये जवळपास 1 लाख 41 हजार रुपये देणार आहे.

अर्ज भरताना काही प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे-
विद्यापीठात अर्ज भरताना काही विचित्र प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला द्यावी लागणार आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट करावीशी वाटत नाही. तुम्हाला कोणतं काम  जास्त वेळ करावं असं वाटत नाही, तुम्हाला असं का वाटत नाही की एखादं काम विशेष पद्धतीने केले नाही पाहिजे आणि एखादं काम करण्यासाठी तुम्हीच योग्य व्यक्ती का आहात? अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागणार आहेत.

का असं केलं जात आहे?
विद्यापीठ एका वेगळ्या संकल्पनेवर वर काम करत आहे. 'डिजाइन थियरिस्ट फ्रेडरिक वॉन बोरिस' (Friedrich von Borries) नावाची ही संकल्पना आहे. प्राध्यापक फ्रेडरिक म्हणतात की,'स्थिरता' आणि स्वतःबद्दल  'उच्च कौतुक' एकत्र कसे अस्तित्वात असू शकते हे समजून घेणे हा यामागचा उद्देश आहे.

संकल्पनेबाबत अधिक माहित देताना फ्रेडरिक म्हणाले की, 'आम्हाला 'सक्रियता आणि निष्क्रियता' यावर लक्ष द्यायचं आहे. तुम्ही एका आठवड्यासाठी तुमच्या जागेवरून हलणार नाही असं म्हणालात तर हे प्रभावी असेल. जर तुम्ही जराही न हलता आणि कोणताच विचार करू इच्छित नसाल तर हे नक्कीच जबरदस्त आणि आश्चर्यकारक असेल. या प्रोजेक्टसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. जानेवारी 2021 पर्यंत जर यासाठी कोणीही पात्र ठरल्यास त्यास ती रक्कम दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com