esakal | किम जोंग उन कोमात की मृत्यू? बहिणीकडे जबाबादारी सोपवल्यानं चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

kim jong un

उत्तर कोरियात सत्तेचे आंशिक हस्तांतरण ही कृती अतिशयोक्ती वाटत असून किम त्यांचे अधिकार लवकरच पूर्णपणे दुसऱ्याकडे देतील असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. 

किम जोंग उन कोमात की मृत्यू? बहिणीकडे जबाबादारी सोपवल्यानं चर्चांना उधाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्योंगयांग - उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याची प्रकृती बिघडली असून कोमात गेला असल्याची माहिती दक्षिण कोरियातील एका नेत्याने दिल्याचं वृत्त डेली मेलने दिलं आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती किम डेई जुंग यांचे माजी सहकारी चांग सोंग मिन यांनी किम जोंगची तब्येत बिघडल्याचा दावा केला आहे. चांग सोंग मिन यांच्या दाव्यानुसार उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन कोमात आहे. एवढंच नाही तर त्यामुळेच किम जोंग यांची बहिण किम यो जोंग हिच्याकडे अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे संबंध सुधारण्याची जबाबदारी देण्यात आल्याचं ते म्हणाले. दक्षिण कोरिया हेरॉल्डने चीनमधील सूत्रांच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळाल्याचा दावा केला आहे. 

दक्षिण कोरियाच्या माध्यामांसोबत चर्चेवेळी चांग सोंग मिन यांनी म्हटलं की, माझ्या माहितीनुसार किम जोंग कोमात आहे. त्यांचा मृत्यू झालेला नाही तर ते जिवंत आहेत. किम जोंग उन यांच्यानंतर कोण याची निवड अद्याप केलेली नाही. त्यामुळेच किम यो जोंगला पुढे आणलं जात आहे. कारण जास्त काळ प्रमुख पद रिक्त ठेवता येणार नाही. 

उत्तर कोरियामध्ये बराच काळ काम केलेले पत्रकार रॉय केली यांनी दावा केला की, उत्तर कोरियात मोठ्या प्रमाणावर गुप्तता पाळली जाते. तिथं राहणाऱ्या नागरिकांनीही देशात काय घडतंय याची कल्पना नसते. रॉय यांनी डेली एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, मला खरंच वाटतं की किम जोंगचा मृत्यू झाला आहे मात्र त्याबद्दल खात्रीने सांगता येत नाही. दरम्यान, किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत एप्रिल महिन्यातही अशीच चर्चा झाली होती. किम जोंग बराच काळ सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात न दिसल्यानं प्रकृती बिघडल्याचं म्हटलं जात होतं.

हे वाचा - दाऊद इब्राहिमला व्हायचं होतं सरेंडर, पण भारत सरकारने संधी चुकवली

बहिणीकडे सोपवलेल्या जबाबदारीमुळे शंकेला वाव
हुकुमशहा किम जोंग यांनी बहिण किम यो जोंगवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी लहान बहीण किम यो जोंगला अघोषित उपाध्यक्ष (डी फॅक्ट सेकंड इन कमांड) बनविल्याचे वृत्त दक्षिण कोरियातील गुप्तचर संस्थेने दिलं होतं.

हे वाचा - नवाल्नी यांच्यावर होती पोलिसांची पाळत; सहकाऱ्याने एक डीश ऑर्डर केल्याने लागला पत्ता

किम यो जोंगकडे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्याबरोबरचे संबंध सुधारण्याची जबाबदारी दिली होती. मात्र या चर्चेनंतर अनेकांनी भूवया उंचावल्या होत्या. उत्तर कोरियात सत्तेचे आंशिक हस्तांतरण ही कृती अतिशयोक्ती वाटत असून किम त्यांचे अधिकार लवकरच पूर्णपणे दुसऱ्याकडे देतील असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे बहिणीकडे सोपवलेल्या या जबाबदारीमुळे आता त्यांच्या प्रकृतीची चर्चा खरी आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

loading image