
2020 वर्षात जगाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आता एका चमत्कारिक खांबाने सर्व जगाला आश्चर्यचकित केले आहे.
बुखारेस्ट- 2020 वर्षात जगाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आता एका चमत्कारिक खांबाने सर्व जगाला आश्चर्यचकित केले आहे. धातूचा बनलेला एक खांब अमेरिकेच्या युटामधील वाळवंटात दिसला होता, त्यानंतर तो गायब झाला. हा रहस्यमयी खांब कोठे गायब झाला याचा उलगडा झाला नसतानाच आता हा खांब यूरोपमध्ये दिसला आहे. रोमानियामध्ये अशाच प्रकारचा एक धातूचा खांब दिसल्याने लोक गोंधळात पडले आहेत.
रात्री चमकणाऱ्या लाटांचं सत्य काय, "गुलाबी थंडीत रत्नागिरीतील आरे वारे...
यूटातून गायब झाला होता खांब
अमेरिकेत यूटाच्या दक्षिणेतील वाळवंटात दोन आठवड्यांपूर्वी सापडलेला धातूचा खांब अचानकपणे गायब झाला होता. एका राज्य टीमला 18 नोव्हेंबर रोजी हेलिकॉप्टरमधून एक वस्तू दिसली होती. ही वस्तू एका व्यक्तीच्या उंचीपेक्षा दुप्पट उंचीची होती. हा धातूचा खांब सर्वसाधारण धातूपेक्षा वेगळा होता आणि तो वाळवंटात सापडल्याने जगभरात चर्चा सुरु झाली होती. फेडरल ब्यूरो ऑफ लँड मॅनेजमेंट किंवा स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीकडे हा खांब गायब झाल्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर अशाच प्रकारचा खांब यूरोपमध्ये दिसल्याने पुन्हा तर्कवितर्क लावले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतून धातूचा खांब गायब झाल्यानंतर 24 तासात रोमानियामध्ये अशाच प्रकारचा खांब दिसून आला आहे. असा दावा केला जातोय की यूटामधील खांबाची चर्चा होत असल्याने त्याची कॉपी म्हणून हा खांब लावण्यात आला आहे.
ब्रिटनने शर्यत जिंकली; पुढच्या आठवड्यापासून सर्वांना मिळणार लस
कलाकारीची कृती
काही लोकांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत आढळलेला असाधारण धातूचा खांब जॉन मॅकक्रॅकन यांनी लावला होता. जॉन यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलाला 2002 मध्ये सांगितले होते की त्यांनी आपल्या कलाकृती दूर ठिकाणी सोडल्या आहेत. ज्या कधीतरी लोकांना सापडतील. दरम्यान, धातूचा खांब वाळवंटात सापडण्यामागचे कारण कोणतेही असो, पण ही वस्तू दिसणे आणि त्यांनंतर ती गायब होणे यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.