
भारतासह 180 देशांत कोरोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
नवी दिल्ली- कोरोना विषाणूविरोधातील युद्धात ब्रिटनने ऐतिहासिक घोषणा केली आहे. फायझर बायोटेकच्या कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. पुढील आठवड्यात सामान्य लोकांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. भारतासह 180 देशांत कोरोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
जगभरात कोरोनामुले सुमारे 6.4 कोटींहून अधिक जण बाधित झाले आहेत. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 16 लाखांहून अधिक जण बाधित झाले आहेत. याचदरम्यान ब्रिटनमध्ये आता सामान्य लोकांसाठी कोरोना विषाणूवरील लशीला मंजुरी मिळाली आहे. फायझर/बायोएनटेक कोरोना लशीला सामान्य लोकांना वापरण्यास परवानगी दिली आहे. आता लवकरच ब्रिटनमध्ये सामान्य लोकांना कोरोना लस दिली जाईल.
हेही वाचा- चीननेच रचला होता गलवान खोऱ्यातील हिंसाचाराचा कट, अमेरिकेच्या रिर्पोटमध्ये खुलासा
UK authorises Pfizer-BioNTech COVID-19 vaccine, to be made available across the country from next week pic.twitter.com/gHVXZ98cLD
— ANI (@ANI) December 2, 2020
कोरोना विषाणूविरोधात 95 टक्के सुरक्षा देणारी लस नागरिकांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी तयार असल्याचे ब्रिटिश नियामक एमएचआरने म्हटले आहे. सुरुवातीला ज्यांना लस दिली जाणार आहे त्यासाठी प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. ब्रिटनने आधीच चार कोटी लशींची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर 2 कोटी लोकांचे लशीकरण करण्यासाठी पुरेसी आहे. प्रत्येक व्यक्तीला दोनवेळा लस दिली जाईल. त्याचबरोबर आणखी एक कोटी लस उपलब्ध केली जाईल.
हेही वाचा- शेवटी बाईपण सोडून 'पुरुष' व्हावं लागलं, कित्येक वर्षांपासून होती त्रस्त
ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस
यापूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेन्का लशीच्या चाचणीचे प्रमुख प्रो. एँड्यू पोलार्ड यांनी फायझरच्या लशीपेक्षा 10 पट स्वस्त असेल असा दावा केला होता. दरम्यान, फायझरची लस -70 डिग्री सेल्सियस तापमानावर ठेवावी लागेल आणि काही आठवड्याच्या अंतरावर दोन इंजेक्शन द्यावे लागतील. ऑक्सफर्डची लस फ्रिजमधील तापमानावर ठेवता येईल.