तालिबानी हल्ल्यात 100 हून अधिक ठार

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

काबुल : उत्तर अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर झालेल्या तालिबानी हल्यात 100 हून अधिक अफगाणी सैनिक ठार झाल्याची माहिती येथील संरक्षण विभागाने दिली आहे.

काबुल : उत्तर अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर झालेल्या तालिबानी हल्यात 100 हून अधिक अफगाणी सैनिक ठार झाल्याची माहिती येथील संरक्षण विभागाने दिली आहे.

हल्ला झाला तेव्हा बहुतांश सैनिक शुक्रवारचे नमाज पठण करत होते. हल्लेखोरांपैकी दोघांनी स्वत:ला उडवून घेतले, तर आणखी सात जण मारले गेले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता असून, अनेक सैनिक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मारले गेलेले सर्व जण हे नव्याने भरती झालेले युवक असून, ते प्रशिक्षणासाठी येथे आले होते. दरम्यान, अमेरिकेच्या येथील अधिकाऱ्यांनी आम्हाला अफगाणी सैन्याला प्रशिक्षणात मदत करण्यासाठी आणखी सैन्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सध्या अमेरिकेचे सुमारे आठ हजार चारशेएवढे सैन्य अफगाणिस्तानात असून नाटोचे पाच हजार सैन्यही येथे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: More than 100 killed in Taliban attack