Coronavirus : कोरोनाबाधितांची संख्या गेली अडीच लाखांवर; अन् मृतांचा आकडा...

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

- आत्तापर्यंत पावणे तीन लाखांहून अधिक रुग्णांना झाली कोरोना व्हायरसची लागण.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फटका 177 देशांना बसला आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. आत्तापर्यंत पावणे तीन लाखांहून अधिक रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सध्या 11,385 जणांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीत गेल्या 24 तासात तब्बल 627 जण दगावले आहेत. मागील 19 दिवसात इटलीमध्ये 3950 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृतांचा आकडा एक हजारहून अधिक झाला आहे. गेल्या 13 दिवसात 1063 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनावर मात करुन 92 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. तर सात हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती अद्याप गंभीर बनली आहे. 

Coronavirus: गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल 

भारतात कोरोनाचा फैलाव होण्याचा वेग इतर देशांच्या तुलनेत कमी असला तरी, तो थांबलेला नाही. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 200 पेक्षा अधिक झाली आहे. त्यात 32 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे देशात चिंतेचं वातावरण असलं तरी, केंद्र आणि राज्य सरकारने संसर्ग वाढू नये म्हणून, काही कठोर पावले उचलत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 2 lakhs 76 thousand peoples have been infected by the coronavirus globally