१०० फूट विहिरीत पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

१०० फूट विहिरीत पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Summary

गेल्या ४ दिवसांपासून विहिरीत पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते.

आफ्रिकेतील मोराक्कोमध्ये (Morocco) गेल्या ४ दिवसांपासून एका चिमुकल्याला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. १०० फूट खोल विहिरीत पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं पण त्याचा मृत्यू झाला होता. मंगळवारी सायंकाळी खेळताना ५ वर्षांचा रयान खोल विहिरीत पडला होता. (Boy died who trapped in deep well in Morocco)

चार दिवसांपासून रयानला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. रयान सुखरुप बाहेर निघावा यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात होती. रयान विहिरीत पडला तेव्हा तो सुरक्षित होता. त्याला वाचवण्यासाठी वेगाने मोहिम सुरु होती.

मंगळवारी सायंकाळपासून सुरु असलेल्या बचावकार्याला शनिवारी रात्री यश आले. मात्र, रयानची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. रयानला पाइपमधून ऑक्सिजन आणि पाणी दिलं जात होतं. रयान ज्या विहिरीत पडला होता त्याची रुंदी ही बोअरवेलपेक्षा काही सेंटीमीटर जास्त होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com