esakal | भारताचा जवळचा मित्र रशियाची तालिबानला साथ | Russia
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin

भारताचा जवळचा मित्र रशियाची तालिबानला साथ

sakal_logo
By
दीनानाथ परब

मॉस्को: अफगाणिस्तानच्या (Afganistan) मुद्यावर चर्चा करण्यासाठी रशिया (Russia) तालिबानच्या (Taliban) प्रतिनिधीला निमंत्रित करणार आहे. मॉस्कोमध्ये (Moscow) २० ऑक्टोबरला ही बैठक आयोजित करण्याचा विचार आहे. अफगाणिस्तानसाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नियुक्त केलेल्या विशेष प्रतिनिधीने ही माहिती दिली. झामीर काबुलोव्ह असे या प्रतिनिधीचे नाव आहे. भारत आणि रशिया परस्परांचे खूप चांगले मित्र आहेत. पण बदलत्या परिस्थितीत रशिया पाकिस्तान आणि तालिबानकडे झुकत असल्याचे दिसत आहे.

नियोजित चर्चेसंबंधी त्यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले आहे. रशियन वृत्त संस्थेने हे वृत्त दिले आहे. मॉस्कोने अफगाणिस्तानसंबंधी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत रशिया, अमेरिका आणि चीन सहभागी झाले होते. अमेरिकन सैन्य ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघारी फिरलं. त्याच दरम्यान तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवलं. सध्या तरी तालिबानला चीन, पाकिस्तान आणि रशिया या तीन देशांचे समर्थन प्राप्त आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश

अफगाणिस्तानात चीनच्या लष्करी विमानांचे लँडिंग

अमेरिकन सैन्याने (american army) अफगाणिस्तानातून (Afganistan) माघार घेतल्यानंतर पहिल्यांदाच बगराम एअरबेसवर (bagram airbase) लष्करी विमाने लँडिंग करताना दिसली आहेत. ही विमाने चिनी सैन्याची (china army) असण्याची शक्यता आहे. आता बगराम एअरबेसवरील दिवे सुद्धा सुरु करण्यात आले आहेत. बगराम तोच एअर बेस आहे, ज्यावर चीनची सुरुवातीपासून नजर आहे. अमेरिकन सैन्याने बगराम एअर बेस सोडल्यानंतर चीन हा हवाई तळ आपल्या ताब्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

हेही वाचा: रेल्वेकडून कोरोना नियमावलीत वाढ; सतर्क राहा अन्यथा भरावा लागेल दंड

बगराम एअरबेस अमेरिकन सैन्याचा मजबूत किल्ला होता. इथूनच त्यांनी अनेक ऑपरेशन्स केली आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून मायदेशी परतल्यानंतर इथे पहिल्यांदा लष्करी विमानांची हालचाल दिसून आली आहे. डेली मेलने हे वृत्त दिले आहे.

loading image
go to top