ख्राइस्टचर्च हल्लेखोराला मरेपर्यंत तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही अशी शिक्षा

यूएनआय
Thursday, 27 August 2020

न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च (Christchurch ) शहरात 15 मार्च 2019 दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार करणार्‍या  ब्रेंटन या ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ( (Life imprisonment without parole) ) सुनावली आहे. यामूळे आता ब्रेंटनला कसलाही पॅरोल मिळणार नाही तसेच त्याला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे.

न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च (Christchurch ) शहरात 15 मार्च 2019 दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार करणार्‍या  ब्रेंटन या ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ( (Life imprisonment without parole) ) सुनावली आहे. यामूळे आता ब्रेंटनला कसलाही पॅरोल मिळणार नाही तसेच त्याला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे. हल्ल्यावेळेस  ब्रेंटनने मशिदीत प्रवेश करून गोळीबार केला होता, ज्यामध्ये 51 लोक ठार आणि 40 जण जखमी झाले होते. कहर म्हणजे या हल्लेखोरांने फेसबुकवर 'लाइव स्ट्रीमिंग' करून  'सफाई कर रहा हूं' असं लिहलं होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्यायालयात ब्रेंटनविरूद्ध एकूण 82 खटल्यांची सुनावणी झाली. त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा झाली आहे. 'आमच्या देश ही मानवतेसाठी प्रसिध्द आहे. पण तू आमच्या देशात फक्त द्वेषाच्या भावनेतून  येऊन हा हत्याकांड केलास, असं न्यायाधिश सुनावणीवेळेस म्हणाले. ही न्यूझीलंडच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे जिथं पहिल्यांदाच एखाद्या आरोपीला पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सुनावनीवेळेस या हल्ल्यातील पीडितांचे कुटुंबही उपस्थित होते. तसेच या खटल्याची सुनावणी पूर्ण व्हायला एक वर्षाचा कालावधी लागला.

अमेरिकेत सरासरी दररोज सापडतात एवढे रुग्ण; तर एवढ्या रुग्णांचा होतोय मृत्यू 

'हा हल्ला मानवतेविरूद्धचा मोठा हल्ला होता. या हत्याकांडात मरण पावलेला सर्वात लहान मृत अवघ्या 4 वर्षांचा होता, अशी माहिती या केसचे न्यायाधीश कॅमेरून मेंडर यांनी दिली. ब्रेंटनच्या शिक्षेची सुनावणी ख्राइस्टचर्च हायकोर्टात झाली आहे. पोलिसांनी कोर्टाला सांगितले की ब्रेंटनला त्याच्या या कृत्याबद्दल पश्चात्ताप नसून त्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही.

विमानांच्या घुसखोरीवरून  तणाव; युद्धसराव टिपल्याचा चीनचा आरोप

मागील वर्षी 15 मार्चला ऑटोमॅटिक राइफल आणि मॅग्जीन (rifle and magazine) घेऊन ख्राइस्टचर्चमधील एका मशिदीत प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला होता. तेथे त्याने 40 जणांना ठार केलं, त्यानंतर तो पळून जात असताना त्याला काही अंतरावर दुसरी मशीद दिसली. नंतर तो त्यातही शिरला आणि गोळीबार केला, तिथं 11 लोक मरण पावले होते. या हल्ल्याच्या नियोजनासाठी ब्रेंटन 2017 मध्ये ऑस्ट्रेलियामधून न्यूझीलंडमध्ये शिफ्ट झाला होता. न्यूझीलंडमध्ये जाऊन त्याने भाड्याने घर घेऊन शस्त्रे गोळा केली होती. न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी घटनेच्या दिवसाला न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हटलं होतं.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mosque gunman Life imprisonment without parole