'या' देशात शारीरिक संबंधापासून लांब राहतात लोक; सर्व्हेक्षणातून कारण आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

physical contact

या अहवालानुसार अमेरिकेतील शारीरिक संबंध करण्यामधील आवड खूपच कमी झाली आहे, विशेषतः कॅज्युअल शारीरिक संबंधामध्ये.

'या' देशात शारीरिक संबंधापासून लांब राहतात लोक

अमेरिकेतील लोकांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा सतत कमी होत आहे आणि एका अभ्यासातून हे समोर आले आहे. या अहवालानुसार अमेरिकेतील शारीरिक संबंध ठेवण्यामधील आवड खूपच कमी झाली आहे, विशेषतः कॅज्युअल शारीरिक संबंधामध्ये. सर्व्हेक्षणात सुमारे 30 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी कमीत कमी एक वर्ष शारीरिक संबंध ठेवलेला नाही. 2011 आणि 2019 मधील अमेरिकन तरुणांच्या (सेक्सुअल हॅबिट) लैंगिक सवयींची तुलना करणाऱ्या नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथच्या डेटाच्या आधारे संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

हेही वाचा: दिर्घकाळ शारीरिक संबंध न ठेवणे फायदेशीर का नुकसानदायक?

काय सांगतोय अभ्यास - आकडेवारीनुसार, अमेरिकेतील तरुण शारीरिक संबंध कमी ठेवत आहेत. जोडीदारासोबत राहत असूनही ते शारीरिक संबंधात (फिजिकल रिलेशनशिप) रस दाखवत नाहीत. अनेक महिलांनी अनेक वर्षांपासून लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत. अजूनही जोडीदारासोबत राहणाऱ्या किंवा विवाहित व्यक्तींपेक्षा यामध्ये जास्त संख्या असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

हेही वाचा: जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहात का?

या अभ्यासात 2011 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये तरुणांची संख्या 40 टक्क्यांवरून 32 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे आढळून आले आहे. विवाहित लोकांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय मानले जाते, परंतु सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की, लग्नाला उशीर झाल्यामुळे लोकांची शारीरिक संबंधामध्ये रस कमी होत आहे. विशेषतः महिलांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होत असल्याचे दिसून आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 'दर चार महिलांपैकी एक अमेरिकन महिलेने शारीरिक संबंध ठेऊन दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झालेला आहे.

हेही वाचा: वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध का गरजेचे आहेत?

सर्व्हेक्षणातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 25 वर्षांवरील वयोगटातील महिलांमध्ये दिसून आली. काही वर्षांपूर्वी लैंगिकदृष्ट्या सक्रिय असूनही, वीसपैकी एका महिलांना लैंगिक संबंध ठेवून 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झालेला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोनादरम्यान आणि नंतर लोकांच्या लैंगिक जीवनात बरेच बदल दिसून आले आहेत. कोरोना साथीच्या दिवसात लोकांचे लैंगिक संबंधामध्ये बरेच बदल दिसून आले आहेत.

हेही वाचा: 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध बलात्कार नाही- कोर्ट

शारीरिक संबंधापासून दूर राहण्याची कारणे - अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून तरुणांच्या लैंगिक इच्छा कमी होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी संशोधन करत आहेत. स्कॉट साउथ आणि लेई लेई यांनी त्यांच्या एका अभ्यासात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. जसे की दीर्घकालीन रिलेशनशिप, लग्नापासून किंवा इतर सामाजिक चालीरीतींपासून अंतर, सोशल मीडियाचा अतिवापर, अति मद्यपान, व्हिडिओ गेमचे व्यसन आणि पोर्नोग्राफीसारख्या गोष्टीही लैंगिक जीवन बिघडवण्याचे काम करतात. तज्ज्ञांच्या मते, कोरोनामुळे आयसोलेशनमध्ये राहिल्यामुळे या सवयींना आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. एकांतात राहण्याची सवयही लोकांमध्ये वाढत आहे. या सर्व गोष्टी तरुणांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी करण्याचे काम करत आहेत.

loading image
go to top