कार्यालयातही हवी थोडीशी "डुलकी'! 

sleep at work
sleep at work

नवी दिल्ली : पुरेशी झोप ही निरोगी आरोग्यासाठी आवश्‍यक असल्याचे म्हटले जाते. अपुरी आणि अनियमित झोप झाल्यास त्याचा परिणाम आपल्या दिनक्रमावर होत असतो. त्यामुळे पूर्वी कामाच्या वेळी डुलकी लागली की वरिष्ठांचा ओरडा पडायचाच. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. म्हणूनच कार्यालयीन ठिकाणी थोडीशी डुलकी घेता आल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते आणि त्यासाठी कार्यालयात विश्रांती कक्ष असल्यास कर्मचाऱ्यांना चांगल्याप्रकारे काम करता येते, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे. 

कार्यालयीन ठिकाणी झोपण्याची सुविधा मिळण्याबाबत नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सहभागी झालेल्या दीड हजार लोकांपैकी 70 टक्‍के जणांनी कार्यालयात झोप घेण्यासाठी विश्रांती कक्ष नसल्याचे सांगितले, तर 86 टक्‍के लोकांनी कार्यालयात विश्रांती कक्ष असल्यास कामाकाजात निश्‍चितपणे सुधारणा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. या संशोधनातील आणखी एक महत्वाचा निष्कर्ष म्हणजे, 41 टक्‍के लोकांनी कार्यालयीन तणाव आणि रात्री उशिरापर्यत काम करावे लागत असल्याने झोपण्यात अनियमितता असल्याचे सांगितले. 

देशात झोपण्याच्या अनियमितेमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष निर्माण करण्याबाबत पुढाकार घेणे अत्यावश्‍यक असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. 31 टक्के लोकांना कार्यालयीन कामाच्या तणावामुळे रात्री झोप येत नसल्याचे म्हटले आहे. तसेच 80 टक्के लोकांना आठवड्यातून दोन-तीन दिवस तरी कामाच्या वेळेत झोप येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे काम करताना झोप येऊ नये म्हणून वारंवार कॉफी किंवा चहा घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. एकंदरीतच या सर्वेक्षणानुसार, कार्यालयात कामाच्या वेळेदरम्यान 20 ते 30 मिनिटांची छोटीशी झोप घेण्यासाठी विश्रांती कक्ष असल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता निश्‍चितपणेवाढेल, असे निष्पन्न झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com